शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात;  रानडुकरांनी केळीचे पीक केले फस्त

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डीसह कासोद शिवपूर या परिसरातील शेतकऱ्यांवर सुरुवातीपासूनच संकटाची मालिका सुरू आहे. कधी कमी पाऊस तर कधी जास्त पाण्यामुळे येथील बळीराजा सापडला आहे.

बोर्डी (जि. अकोला)  ः सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डीसह कासोद शिवपूर या परिसरातील शेतकऱ्यांवर सुरुवातीपासूनच संकटाची मालिका सुरू आहे. कधी कमी पाऊस तर कधी जास्त पाण्यामुळे येथील बळीराजा सापडला आहे.

त्यातच आता वन्य प्राण्यांमुळेही शेती करणे कठीण झाले आहे. बोर्डी शेतशिवारातील चंद्र प्रकाश बोंद्रे यांच्या शेता रानडुकरांनी केळीचे उभे पीक फस्त केले आहे. त्यातच कपाशीवरील बोंडअळीनेही शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट आली आहे.

बोर्डी परिसरातील हरभरा, मका, केळी, संत्रा, तूर या पिकाचे मोठ्या प्रमाणात रानडुकरांकडून नुकसान होत आहे. समाधानकारक उत्पन्न होईल या आशेने आर्थिक परिस्थिती नसतानासुद्धा पैशाची जुळवाजुळव करून मोठ्या मेहनतीने पीक उभे गेली;

मात्र परतीच्या पावसामुळे सर्व आशेवर पाणी फिरले. त्यात वन्यप्राण्यामूळे होणाऱ्या नुकसानीची भर पडत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची सर्व्हेकरून झालेले नुकसान भरपाई त्वरीत मिळवी, आशी आशा व्यक्त केली आहे.

(संपादन - विवेकम ेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Cows destroy banana crop