esakal | सरपंचपदाच्या महिला आरक्षणाबाबत उत्सुकता, शुक्रवारी होणार जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Curiosity about Sarpanch reservation for women will be announced on Friday

 सन २०२० ते २०२५ दरम्यान अकोला जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीव्दारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण मंगळवारी जाहीर करण्यात आले. तहसीलस्तरावर तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील अनुसूचित जाती, जमाती तसेच नागरिकांचा मागास प्रवर्गामधील व्यक्तीकरिता सरपंचाची पदे आरक्षित करण्यात आल्यानंतर आता शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या महिला आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरपंचपदाच्या महिला आरक्षणाबाबत उत्सुकता, शुक्रवारी होणार जाहीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : सन २०२० ते २०२५ दरम्यान अकोला जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीव्दारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण मंगळवारी जाहीर करण्यात आले. तहसीलस्तरावर तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील अनुसूचित जाती, जमाती तसेच नागरिकांचा मागास प्रवर्गामधील व्यक्तीकरिता सरपंचाची पदे आरक्षित करण्यात आल्यानंतर आता शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या महिला आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्गातील स्त्रीयाकरिता आरक्षणाची सोडत जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली ता. ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे.

अकोटची आरक्षण सोडत सकाळी ११ वाजता, तेल्हाराची सकाळी ११.३० वा., बाळापूरची दुपारी १२ वा., पातुरची १२.३० वा., मूर्तिजापूरची दुपारी १ वा., बार्शीटाकळीची आरक्षण सोडत दुपारी १.३० वाजता, तर अकोलाची आरक्षण सोडत दुपारी २ वाजता होणार आहे.

तरी सर्व नागरिकांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी सोडतीस उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक शाखेचे प्रभारी अधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.


तालुकानिहाय असे जाहीर झाले आरक्षण
तालुका ग्रामपंचायती अ.जाती अ. जमाती नामाप्र साधारण
तेल्‍हारा ६२ १४ ६ १७ २५
अकोट ८४ १६ १२ २३ ३३
मूर्तिजापूर ८६ २२ ३ २३ ३८
अकोला ९७ २८ ८ २६ ३५
बाळापूर ६६ २१ २ १८ २५
बार्शीटाकळी ८० १२ ६ २२ ४०
पातूर ५७ १२ ८ १५ २२
एकूण ५३२ १२५ ४५ १४४ २१८

(संपादन - विवेक मेतकर)

loading image