हिंगणी येथे सिलेंडरचा स्फोट; तीन घरे पूर्णतः भस्म

धीरज बजाज
Wednesday, 16 September 2020

तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिंगणी बु. येथील श्रीमती मंगलाबाई शेषराव कोरडे या महिलेच्या घरी मंगळवारी (ता. १५) सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान स्वयंपाकासाठी गॅस सुरू केला असता इण्डेन सिलेंडरने अचानक पेट घेतला. त्यामुळे सिलेंडर ने पेट घेतल्याचे पाहताच एकच धावपळ मंगलाबाई कोरडे यांच्यासहित शेजाऱ्यांनी आरडाओरड केला आणि घराबाहेर पळाले.

हिवरखेड (जि.अकोला) :  हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिंगणी बु. येथे सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. त्यामध्ये तीन घरे जळून खाक झाली असून लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिंगणी बु. येथील श्रीमती मंगलाबाई शेषराव कोरडे या महिलेच्या घरी मंगळवारी (ता. १५) सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान स्वयंपाकासाठी गॅस सुरू केला असता इण्डेन सिलेंडरने अचानक पेट घेतला. त्यामुळे सिलेंडर ने पेट घेतल्याचे पाहताच एकच धावपळ मंगलाबाई कोरडे यांच्यासहित शेजाऱ्यांनी आरडाओरड केला आणि घराबाहेर पळाले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यानंतर थोड्याच वेळात पेटलेल्या सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. ज्यामुळे बॉम्बस्फोट सदृश्य मोठा धमाका झाला. सिलेंडरचा स्फोट होताच गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी धाव घेतली आणि युवकांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

आगीमुळे मंगलाबाई कोरडे यांच्या घरासह शेजारील माणिकराव सदाशिव कोरडे आणि गोपाल विश्वनाथ कोरडे अशा एकूण तीन घरातील संपूर्ण मुद्देमाल जळून खाक झाला आणि तिन्ही घरे राहण्यास योग्य राहिली नाहीत. तेल्हारा अग्निशमन दलाने घटनास्थळी घाव घेत आग विझविण्यास पुढाकार घेतला.

तिन्ही कुटुंब उघड्यावर
मंगलाबाई घरातील रोकड पन्नास हजार रुपये, जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. दोन क्विंटल गहू, तांदूळ, ज्वारी, डाळी, रेशन कार्ड, बँक पासबुक इत्यादि सर्व नामशेष झाले. मंगलाबाई सोबतच दोन्ही शेजाऱ्यांच्या घरातील संपूर्ण साहित्य भस्मसात झाले. त्यामुळे तिन्ही कुटुंब उघड्यावर आले आहेत. हिवरखेड पोलिस घटनास्थळी पोहोचली आणि तलाठ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
(संपादन - विवेक मेतकर)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Cylinder explodes at Hingani; Three houses completely burnt down