esakal | खळबळजनक: विष प्रयोग करून केली मृत बिबट्याची हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola News: Dead leopard killed using poison

वन्यजीव विभागाच्या व प्रादेशिक वनविभागाच्या सीमारेषेवर ता. ९ नोव्हेंबर रोजी दोन ते अडीच वर्षाचा नर जातीचा एक विबट मृतावस्थेत आढळुन आल्याने खळबळ माजली होती.

खळबळजनक: विष प्रयोग करून केली मृत बिबट्याची हत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव राजा (जि.बुलडाणा)   : वन्यजीव विभागाच्या व प्रादेशिक वनविभागाच्या सीमारेषेवर ता. ९ नोव्हेंबर रोजी दोन ते अडीच वर्षाचा नर जातीचा एक विबट मृतावस्थेत आढळुन आल्याने खळबळ माजली होती.

मात्र वनविभागाच्या व वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना दोन दिवसांपासून मृतावस्थेत पडलेल्या बिबट्याची खबरबात नसल्याने त्यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतांना वन्यजीव विभागाने तातडीने तापसचक्र फिरवून मंगळवारी सकाळी दोन संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली.

संशयितांना वन्यजीव विभागाच्या पिंजऱ्यात उभे केल्याने लगेच आरोपी पोपटासारखे बोलायला लागले.त्यामुळे या प्रकरणात आणखी दोन आरोपींची वाढ झाल्याने एकूण आरोपी ४ झाले आहेत.

घटनेच्या दोन दिवसांपूर्वी बिबट्याची तस्करी करणारे आरोपी अजाबराव बाबुराव चव्हाण,ताराचंद रोडू राठोड,दयाराम मोरचंद राठोड, राजू रंगलाल पवार सर्व रा.कवडगाव यांना अटक करून त्यांच्यावर चौकशी अंती व कबुली जवाब मान्य केल्याने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे विविध कालमांवये गुन्हे दाखल करण्यात आले असून वनगुन्हा जारी करण्यात आला आहे.

आरोपींनी बिबट्याला विषप्रयोग करून ठार मारले.बिबट ठार झाल्यावर त्याला बैलगाडी त टाकून वन्यजीव विभागाच्या व प्रादेशिक वनविभागाच्या सीमारेषेवर टाकण्यात आले.त्यानंतर बिबट्याच्या पायाची नखे-दात व मिशा या अवयवांची तस्करी केली.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image