
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे अधिक संसर्गजन्य असे नवे रुप आढळून आल्यानंतर राज्यामध्येही खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारी (ता.२२) महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अकोला : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे अधिक संसर्गजन्य असे नवे रुप आढळून आल्यानंतर राज्यामध्येही खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारी (ता.२२) महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या ता. ५ जानेवारीपर्यंत हे नियम लागू असल्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ‘थर्टी फस्ट’ ची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शहरवासीयांच्या स्वप्नावर कोरोनाने पुन्हा एकदा पाणी फेरले आहे. त्यामुळे शहरवासीयांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : महाबीज मुख्यालयात पोलिस बंदोबस्त, भागधारक संतापले, ऑनलाइन सभा आधीच गाजली ऑफलाइन
नवीन वर्षाच्या पूर्व रात्री ‘थर्टी फस्ट’ची तयारी तरूणांसह इतर वयातील नागरिक देखील जवळपास एक महिन्यापासून करतात. नवीन वर्षाचा केक कापणे, जेवन कोणते व कुठे करायचे, सोबत कोण-कोण राहणार, कोण केक कापणार, म्युजिक कोणते वाजणार हे सर्व नियोजन ठरवत असतानाच सोमवारी (ता.२१) महाराष्ट्र शासनाने महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी करण्याचे आदेश काढल्यामुळे महानगरातील हॉटेल, उद्यान, रेस्टॉरंटवर ‘थर्टी फस्ट’ साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या नागरिकांच्या स्वप्नांचा जुराडा झाला. आता महानगरातील रहिवासीयांना नव्याने प्लॅनिंग करून महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेर पार्टी करावी लागणार आहे.
हेही वाचा : चारशे वर्षांनंतर घडून आली दोन ग्रहांची भेट, अकोलेकरांनी अनुभवला अनोखा नजारा
सोहळे, समारंभात घ्यावी लागणार काळजी
ब्रिटन मध्ये नव्याने आढळून आलेल्या कोरोना विषाणुच्या अवतारामुळे राज्यात ठिकठिकाणी होत असलेले धार्मिक-विवाह सोहळे, समारंभात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कोरोना संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्याची झपाट्याने वाढ होते. अशावेळी प्रशासनासह नागरिकांनी देखील काजळी व उपाय-योजना करणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा लॉकडाऊनच्या मार्गावर राज्य जाण्यास उशिर लागणार नाही.
हेही वाचा : एक लाख विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत, प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी समितीही नाही
दिवसभर पूर्ण चालू आणि रात्रीलाच संचारबंदी करून कोरोनाचा संसर्ग थांबेल का? कोरोनाच्या नव्या अवताराला थांबवायचे असल्यास वेळेत काही बदलाव, बाजार पेठेत काही नियम लावून द्यावेत. जणे करून कोरोनाच्या संसर्गाला थांबवता येणार.
-किरण डोंगरे, नागरिक.
हेही वाचा : रुग्णसंख्या वाढली तरी ऑक्सिजनच्या ६८० खाटा रिकाम्या!
हॉटेल व्यावसायिकांची पुन्हा नाराजी
महानगरपालिका क्षेत्रातील संचारबंदीच्या निर्णयामुळे ‘थर्टी फस्ट’च्या होणाऱ्या पार्ट्यांना ब्रेक लागला आहे. वर्षातून दोन-तीन दिवसच सार्वजनिक उत्सवाचे आयोजन हॉटेल व्यवसायीक करत असतात. आणि तीन-चार तास चालणाऱ्या या पार्ट्यांमधून त्यांना चांगले उत्पन्न देखील होते. परंतु, शासनाच्या एका निर्णयाने त्यांच्या मनसुब्यावरही पाणी फेरल्या गेले.
(संपादन - विवेक मेतकर)