
अकोट तालुक्यातिल मंचनपूर सावरा मधील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी जनतेच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप येथे नागरिक करीत आहेत. त्यामुळे चिंताजनक विषय बनला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून गावांमध्ये व परिसरात डेंगीने थैमान घातले असून, जिल्ह्यात कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये यातच डेंगीने थैमान घातले.
वडाळी देशमुख (जि.अकोला) : अकोट तालुक्यातिल मंचनपूर सावरा मधील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी जनतेच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप येथे नागरिक करीत आहेत. त्यामुळे चिंताजनक विषय बनला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून गावांमध्ये व परिसरात डेंगीने थैमान घातले असून, जिल्ह्यात कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये यातच डेंगीने थैमान घातले.
मंचनपूर सावरा परिसरात साथीचे आजार होऊ नये याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. मलेरियाचे रुग्ण वाढत असताना व डेंगीने थैमान घातले असता प्राथमिक आरोग्य केंद्रात शुकशुकाट असतो.
मंचनपूर सावरा ग्रामपंचायत प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर विषयाची दखल न घेतल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावेल लागले असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे श्रेयश चौधरी यांनी डेंगीचे वाढते प्रमाण पाहून प्राथमिक आरोग्य केंद्र व अकोट तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष तोरणेकर निवेदन देवून राष्ट्रवादीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
पंधरा दिवसांपासून मोठा मुलगा आजारी आहे. पाठोपाठ लहान मुलगा ही डेंगी पॉझिटिव्ह आला. सावरा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोणतीच सोय होत नसल्यामुळे अकोटला खासगीमध्ये १० ते १५ हजार रुपये खर्च झाले आहेत.
- गोपाल दयाराम चौधरी, ग्रामस्थ
डेंगी सदृस्य साथीच्या आजाराबाबत उपाययोजना म्हणून तत्काळ धुरळणी करण्यासाठी जिल्हा स्तरावरून औषध मागणी करून गावात प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येणार आहे.
- डॉ. अंकुश वालशिंगे, वैद्यकीय अधिकारी
गेल्या पंधरा दिवसांपासून डेंगीचा थैमान सुरू असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नाही. जनतेच्या जीवाशी खेळू सुरू आहे. तातडीने उपाययोजना न केल्यास राष्ट्रवादीतर्फे तीव्र आंदोलन छेडणार आहे.
श्रेयस चौधरी, पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस
(संपादन - विवेक मेतकर)