दुधाळ जनावरे वाटपात घोळ, सत्ताधाऱ्यांनीच घेतला पुढाकार; लवकरच समोर येणार वास्तव

सुगत खाडे  
Saturday, 12 September 2020

 जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आलेल्या विशेष घटक योजनेअंतर्गत दुधाळ जनावरे वाटप याेजनेत घाेळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून चाैकशी समिती गठित करण्यात आली आहे.
 

अकोला :  जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आलेल्या विशेष घटक योजनेअंतर्गत दुधाळ जनावरे वाटप याेजनेत घाेळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून चाैकशी समिती गठित करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. त्यासाठी विविध विभागांना निधी सुद्धा देण्यात येतो. योजनेसाठी लाभार्थी निवड करताना त्यांच्याकडून रितसर अर्ज मागवल्या जातात. काही योजनांचा लाभ लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर तर काही योजनांचा लाभ ९० टक्क्यांवर देण्यात येतो.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

याव्यतिरीक्त काही योजना शासन स्तरावरून राबविण्यात येतात. काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने विशेष घटक याेजनेअंतर्गत दुधाळ जनावरांचे वितरण करण्याची योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. परिणामी जिल्हा परिषदेने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

देखरेख समितीचा वाॅच
वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा परिषदेतील कारभारावर देखरेखीसाठी गठित केली होती. सदर प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर समितीच्या सदस्यांनी आणि काही प्रमुख जि.प. सदस्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर वंचितचे पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद सदस्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर आता या प्रकरणी चाैकशी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या चाैकशीवर सत्ताधाऱ्यांचे लक्ष राहणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Distribution of milch cattle, the initiative taken by the authorities; The reality will come soon