लाचखोरीत जिल्हा उपनिबंधक लोखंडे निलंबित, सातवा वेतन आयोगाचे वेतन निश्‍चिती आणि एरीअससाठी मागितली होती लाच

मनोज भिवगडे
Thursday, 30 July 2020

तक्रारदाराचे व त्यांच्या अधिननस्थ असलेल्या कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोगानुसार वेतन निश्‍चिती व एरीअसच्या प्रस्तावास मंजुरी देण्यासाठी पाच लाखांची लाच मागणारे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. प्रवीण लोखंडे यांना निलंबित करण्याचे आदेश बुधवारी (ता. 29) देण्यात आले.

अकोला : तक्रारदाराचे व त्यांच्या अधिननस्थ असलेल्या कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोगानुसार वेतन निश्‍चिती व एरीअसच्या प्रस्तावास मंजुरी देण्यासाठी पाच लाखांची लाच मागणारे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. प्रवीण लोखंडे यांना निलंबित करण्याचे आदेश बुधवारी (ता. 29) देण्यात आले.

अकोट बाजार समितीच्या सचिवांसह त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन निश्‍चिती व एरीअसच्या प्रस्तावास मान्यता देण्याकरिता जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे आणि सहाय्यक कर आयुक्त अमर शेठ्ठी यांनी लाच मागितली होती. या प्रकरणात अकोला एसीबीने पडताळणीकरीत 9 जुलै रोजी दोन्ही आरोपींना अटक केली होती.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यांना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने 13 जुलैपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली होती. त्यानंतर त्यांची पोलिस कोठडी16 जुलैपर्यंत वाढविण्यात आली.

जिल्हा उपनिबंधक हे अटक झाल्यानंतर 48 तासापेक्षा अधिक काळ पोलिस कोठडीत राहिल्याने त्यांना निलंबित करण्याचे आदेश सहकार, पणण व वस्त्रोद्योग विभागाने दिले आहे. या विभागाचे अवर सचिव म.ग. जोशी यांच्या स्वाक्षरीने डॉ. लोखंडे यांना निलंबित करण्याचा आदेश बुधवारी काढण्यात आला.

निलंबंन काळात त्यांचे मुख्यालय विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती विभाग अमरावती येथे राहील. त्यांना निलंबन काळात मुख्यालय न सोडण्याचाही आदेश देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News District Deputy Registrar Lokhande suspended for bribery, 7th pay commission's salary fixed and bribe sought