esakal | दिवाळीच्या दिवशीही मंत्र्यांची छापेमारी 
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Dr. Rajendra Shingane raids food stalls at Buldana

 एकीकडे देश दिवाळी साजरी करीत असताना बुलडाण्यात मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ड्यावर खाद्यपदार्थ विकणार्‍या स्टॉलवर छापेमारी करून संबंधितांना तंबी देत अधिकार्‍यांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

दिवाळीच्या दिवशीही मंत्र्यांची छापेमारी 

sakal_logo
By
अरूण जैन

बुलडाणा :  एकीकडे देश दिवाळी साजरी करीत असताना बुलडाण्यात मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ड्यावर खाद्यपदार्थ विकणार्‍या स्टॉलवर छापेमारी करून संबंधितांना तंबी देत अधिकार्‍यांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या.


 यामुळे रस्त्यावर फराळ विकणार यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. बुलडाणा शहरात ठिकाणी उघड्यावर दिवाळीच्या फराळाचे स्टॉल्स लागलेले आहेत.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे सुरुवातीपासूनच भेसळ व उघड्यावर अन्नपदार्थ विक्रीच्या विरोधात आहेत. सर्वसामान्य जनतेला कोरोना सारख्या महाभयंकर काळात त्रास होऊ नये, त्यांच्या आरोग्याला नुकसान पोहोचू नये, या उद्देशाने दिवाळीच्या दिवशी ही श्री. शिंगणे यांनी संबंधित अधिकारी व स्वीय सहाय्यकाला सोबत घेऊन शहरातील जयस्तंभ चौक, कारंजा चौक, एकबाल नगर आदी परिसरात मिठाईची विक्री उघड्यावर करणार्‍यांच्या दुकानांवर छापेमारी केली.


 अनेक ठिकाणी या मिठाईवर माशा बसलेल्या त्यांना दिसून आल्या. संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या विक्रीचे परवाने तपासायला लावून त्यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले. चुकीच्या पद्धतीने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय करू नका, त्यांना अधिकाधिक दंड करा, त्यांचे परवाने रद्द करा, अशा शब्दात श्री शिंगणे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

या कारवाईमुळे उघड्यावर अन्नपदार्थांची व दिवाळीच्या फराळाची विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

(संपादन - विवेक मेतकर,अकोला)

loading image