महानगरपालिकेत तोडफोड; शिक्षणाधिकाऱ्यांना दिली जीवे मारण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

महापालिकेच्या शिक्षणाधिकारी शाहिन सुलताना यांच्या कार्यालयात घुसून काही लोकांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देत साहित्याची तोडफोड केली.

अकोला : महापालिकेच्या शिक्षणाधिकारी शाहिन सुलताना यांच्या कार्यालयात घुसून काही लोकांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देत साहित्याची तोडफोड केली.

ही घटना १३ नोव्हेंबररोजी दुपारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. अकोला महापालिकेच्या शिक्षण विभागात चार ते पाच अनोळखी व्यक्ती पोहचले.

त्यांनी शिक्षणाधिकारी शाहिन सुलताना यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नाहीतर त्यांनी टेबलवरील काच व खुर्च्यांची तोडफोड केली.

घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत ते लोक निघून गेले होते.

याप्रकरणी शिक्षणाधिकारी शाहिन सुलताना यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी या व्यक्तींना ओळखत नसून नेमका हा प्रकार का केला याबाबत कल्पना नसल्याचे सांगितले.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Vandalism in Municipal Corporation; Education officer threatens to kill