एमरॉल्ड हाइटस स्कुलचे संचालक, मुख्याध्यापिका फरार

भगवान वानखेडे
Friday, 4 September 2020

एमरॉल्ड हाइट्स स्कूलने सीबीएससीच्या नावाखाली पालकांची लाखो रुपयाने बोळवण करून फसवणूक केली. याप्रकरणी शाळेचे अध्यक्ष संजय तुलशान त्याची पत्नी अल्पा तुलशान व मुख्याध्यापीका सुवर्णा गुप्ता हीच्यासह संचालक मंडळाविरुध्द खदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अकोला : शहरातील केशवनगर परिसरात असलेल्या एमरॉल्ड हाइट्स स्कूलने सीबीएससीच्या नावाखाली पालकांची लाखो रुपयाने बोळवण करून फसवणूक केली. याप्रकरणी शाळेचे अध्यक्ष संजय तुलशान त्याची पत्नी अल्पा तुलशान व मुख्याध्यापीका सुवर्णा गुप्ता हीच्यासह संचालक मंडळाविरुध्द खदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

त्यानंतर अटकपूर्व जामीनासाठी धावपळ करणाऱ्या संजय तुलशान, अल्पा तुलशान आणि मुख्याध्यापीका गुप्ता यांना अंतरीम अटकपूर्व जामीन न मिळाल्याने ते फरार झाले आहेत.  

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रिंग रोडवरील केशव नगरमध्ये संजय तुलशान व अल्पा तुलशान यांच्या मालकीच्या असलेल्या एमरॉल्ड हाइट्स स्कूलमध्ये इयत्ता पहिली व दुसरीसाठी आॅनलाइन वर्ग न घेण्याचे आदेश असतानासुद्धा आॅनलाइन वर्ग घेणे, शैक्षणिक संस्था शुल्क अधिनियम २०११ नुसार पालक-शिक्षक संघ व पालक शिक्षक संघ कार्यकारी समिती गठीत न करणे, शाळेला स्टेट बोर्डाची मान्यता असताना सीबीएससी अभ्यासक्रमाची पुस्तके विक्री करणे, सीबीएससीच्या नावाखाली पालकांकडून अवाजवी शैक्षणिक शुल्क वसूल करणे, शाळेमधुनच वह्या, पुस्तके, गणवेश व शैक्षणीक साहित्य विक्री करणे, शाळेला स्टेट बोर्डचा अभ्यास न शिकविता सीबीएससी अभ्यासक्रम शिकविणे, तसेच सीबीएससीच्या नावाखाली पालकांकडून बेकायदेशीर रक्कम वसूल करण्यात आल्याचा हा सर्व प्रकार चौकशीत उघड झाल्यानंतर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्याम विठ्ठलराव राऊत यांनी खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली

होती. यावरुन पोलिसांनी दोषी असलेल्या संस्थेचा अध्यक्ष संजय तुलशान, अल्पा तुलशान, मुख्याध्यापीका सुवर्णा गुप्ता हीच्यासह संचालक मंडळाविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जामीन न मिळाल्याने तुलशान दाम्पत्यासह संचालक व मुख्याध्यापीका फरार झाले आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Emerald Heights School Director, Headmistress absconding