
राज्यातील सर्वात जुने विमानतळ असलेल्या अकोला येथील शिवनी विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारिकरण करण्यासाठी खासगी जमीन हस्तांतरण करण्यात येणार आहे. त्यासाठी धावपट्टी विस्तारिकरणाची व्यवहार्यता तपासण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेखी स्वरुपात दिले आहे.
अकोला : राज्यातील सर्वात जुने विमानतळ असलेल्या अकोला येथील शिवनी विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारिकरण करण्यासाठी खासगी जमीन हस्तांतरण करण्यात येणार आहे. त्यासाठी धावपट्टी विस्तारिकरणाची व्यवहार्यता तपासण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेखी स्वरुपात दिले आहे.
शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी शिवनी विमानतळाच्या धावपट्टी विस्तारिकरणाच्या कामासाठी जागा हस्तांतरणाचे काम रखडले असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला लेखी स्वरुपात दिलेल्या उत्तरात जागा हस्तांतरणाचे काम रखडले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. धावपट्टी विस्तारिकरणासाठी २२.२४ हेक्टर आर जमिनीची आवश्यकता भासणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अकोला विमानतळाच्या विस्तारिणाबाबत ता. ७ फेब्रुवारी २०२० रोजी आढावा बैठकही घेण्यात आली होती. या बैठकीत विस्तारिकरणाची व्यवहार्यता तपासणाचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. शिवनी विमानतळ हे भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या अधिकार क्षेत्राखाली येते असल्याने त्यासंदर्भात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने त्यांना कळविले आहे. त्यांचे उत्तर अद्याप आलेले नाही, असेही या लेखा उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.
..............
नवीन विमानतळाचा प्रस्ताव नाही
अकोला-शेगावदरम्यान नवीन विमानतळ उभारण्याबाबतचा प्रस्ताव आहे का, या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात असे कोणतेही नवीन विमानतळ उभारण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा संपादन - विवेक मेतकर
|
|||