Akola News: farmer leaves animals in vertical crop of three acres of cotton due to depression
Akola News: farmer leaves animals in vertical crop of three acres of cotton due to depression

हतबल शेतकऱ्याने नैराश्यपोटी  तीन एकर कपाशीच्या उभ्या पिकात सोडली जनावरे

पातुर्डा, (जि. बुलडाणा) :  खुर्द येथील विनोद शंकरराव झाडोकार यांच्या मालकीचे पातुर्डा खुर्द शिवारात सहा  एकर शेत आहे.

त्यात त्यांनी सोयाबीन तीन  व  कपाशीचा तीन एकरात पेरा केला. सोयाबीन उभ्या पिकात यापुर्वी जनावरे सोडली होती.

 कपाशीवर बोंड अळी मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्याने रासायनिक फवारणी करुनही कपाशी बोंडा वर बोंड अळी कायम असल्याने अखेर हतबल शेतकरी विनोद झाडोकार यांनी उभ्या कपाशि पिकात मेंढरे बकऱ्या जनावरे सोडले. त्यामुळे अपेक्षा भंग झाला.

 शेतकऱ्यांची या वर्षी शासनाने जाहिर केलेली कर्ज माफी झाली नसल्याने कर्ज माफी पासुन वंचीत राहिले पुर्वीच शेतावर दोन लक्ष तिसहजार रुपये सात बाऱ्यावर कर्ज कायम असल्याने बॅकांनी पिक कर्ज देऊ केले नाही.

त्यामुळे  शेतकरीने शेतात उसनवार करुन कसे तरी सोयाबीन व कपाशी पेरले परंतु वातवरणाच्या बदलामुळे परतीच्या पावसाने बहरलेले सोयाबीन झाडांना पापड्याच जास्त व शेगा नगण्य असल्याने शेतकऱ्याची घोर निराशी झाली सोयाबीन उत्पादन खर्च निघत नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येताच तीन  एक्करातील  उभ्या सोयाबीन पिकात जनावर फिरविले.

त्यात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याने कपाशी बोंडाच्या आत  बोंडअळी मोठया प्रमाणात असल्याने व उत्पन्न येण्याची शासवती नसल्याने  तसेच सोयाबीन कापुस  उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे सोयाबीन सह कापुस उत्पादकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

त्यात  शेतात सोयाबीन पेरणी मशागत , तयार करण्यासाठी मळणी यंत्र खर्च पाहत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लावलेला खर्च निघत नसल्याचे वस्तुस्थिती असल्याने काळजावर दगळ ठेवुन नैराश्य पोटी बहुदाह शेतकऱ्यांनी ट्रक्टर रोट्याव्हेटर फिरविले.

उसनवार घेतलेले पैसे परतीची चिंता व त्यात मुलाचे शिक्षण आरोग्य उपजिविका प्रपंच कसा चालवावा या चिंतेत सोयाबीन कापुस उत्पादक  शेतकरी असुन निसर्गाने दगा दिला व एकदम वातावरणात बदल झाला त्यामुळे कपाशी ३ एकरात ३ क्विन्टल कापुस आला त्यामुळे पेरणी मशागत बी बीयाणे खत रासायनिक फवारणी याचा खर्च निघाला नसल्याचे शेतकरी विनोद झाडोकार यांनी सांगितले 

 सद्यस्थितीत आतापर्यंत एकंदरीत झालेला खर्च पाहता उत्पादनाच्या दृष्टीने परवडत नसल्याने शेतकरी चिंता ग्रस्त झाले परतीचा पाऊस धो धो पडल्याने कपाशीचा हंगाम वाढणार व फरदळीची अपेक्षा असतांना शेतकरी जाम खुश होते

परंतु  कपाशीच्या खालच्या भागा पासुन वर शेंड्या पर्यत  बोंड अळी मोठ्या प्रमाणात आल्याने कापुस उत्पादक शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग झाला पातुर्डा खुर्द येथील शेतकरी विनोद शंककरराव झाडोकार यांनी ३ एककर कपाशीच्या उभ्या पिकात मेंढरे बकऱ्या जनावरे सोडले  शासनाने  सोयाबीन कापुस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणुन आर्थिक मदत द्यावी अशी मांगणी जोरधरत आहे

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com