कांदा प्रश्नावर किसान ब्रिगेड धडकणार मुंबईत

मनोज भिवगडे
Thursday, 1 October 2020

केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी जीवनावश्यक वस्तूच्या यादीतून कांदा काढला. त्यामुळे शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात २ ऑक्टोबरला किसान ब्रिगेड मुंबईत धडकणार आहे. तेथे राज्यपलांची भेट घेवून निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती मंगळवारी पोहरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अकोला  ः केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी जीवनावश्यक वस्तूच्या यादीतून कांदा काढला. त्यामुळे शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात २ ऑक्टोबरला किसान ब्रिगेड मुंबईत धडकणार आहे. तेथे राज्यपलांची भेट घेवून निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती मंगळवारी पोहरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कांद्याच्या दराबाबत कुठेही ओरड नसताना विदेशी व्यापार अधिनियमातील अधिकार वापरून केंद्र सरकारने निर्यात बंदी केली. दरवर्षी आयात-निर्यातीचे अधिकार बेदरकारपणे वापरून व कधी फुकटात वाटून शेतकऱ्यांच्या मालाचे बाजारभाव पाडम्याची क्रूर थट्टा सरकार करीत आहे. ही क्रूर थट्टा थांबविण्याची मागमी करण्यासाठी किसान ब्रिगेड २ ऑक्टोबरला अकोला येथून दांडीयत्रा काढणार आहे.

नाशिक मार्गे राज्यभरातील किसान ब्रिगेडचे कार्यकर्ते ३ ऑक्टोबरला मुंबई येथे पोहोचतील. तेथून राज्यपालांना निवेदन देण्यासाठी जाणार असल्याची माहिती पोहरे यांनी दिली. त्यानंतर मुंबईतच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, ऊर्जा मंत्री यांची भेट घेवून राज्य सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या समस्यांचे व शेतमालविषयी चर्चा करणार असल्याचेते म्हणाले.

यात्रेत सहभागी होणाऱ्या शेतकरी २ ऑक्टोबरला अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात एकत्र येऊन नाशिककडे कुच करतील. या दांडीयात्रेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी पोहरे यांनी केले.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Farmers brigade to strike on onion issue in Mumbai