
आजपासून शासकीय मका खरेदी नोंदणी चालू झाले त्यासाठी शेतकरी एक दिवसा अगोदर या मार्केटमध्ये दाखल झाले होते रात्रभर उघड्यावरती अंथरूण-पांघरूण घेऊन या ठिकाणी हजारो शेतकरी पाहायला मिळाले मागील वर्षी अनेक शेतकरी यांनी शासकीय मका खरेदी यामध्ये आपला मका विकण्यासाठी नाव नोंदणी केली होते
बुलडाणा: आजपासून शासकीय मका खरेदी नोंदणी चालू झाले त्यासाठी शेतकरी एक दिवसा अगोदर या मार्केटमध्ये दाखल झाले होते रात्रभर उघड्यावरती अंथरूण-पांघरूण घेऊन या ठिकाणी हजारो शेतकरी पाहायला मिळाले मागील वर्षी अनेक शेतकरी यांनी शासकीय मका खरेदी यामध्ये आपला मका विकण्यासाठी नाव नोंदणी केली होते.
मात्र मागील वर्षी हजारो शेतकरी याठिकाणी वंचित राहिले होते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भीती वाटत होती कि या वर्षी सुद्धा असाच प्रकार होऊ शकतो त्यामुळे लवकरात लवकर आपली नोंद घेऊन आपला मका विकला गेला पाहिजे या साठी दोन दिवस अगोदर शेतकरी याठिकाणी रांगेत दिवस-रात्र मार्केटमध्ये पाहायला मिळाले.
मात्र याठिकाणी शासनाचा नियोजनाचा अभाव या ठिकाणी पाहायला मिळाला असून या ठिकाणी शेतकऱ्यांची कुठलीच व्यवस्था पाहायला मिळाली नाही थंडीत रात्रभर शेतकरयानी मार्केट मद्धे झोपुन काढली.
त्यामुळे एकीकडे शेतकऱ्या वरती नैसर्गिक संकटे येतात तर दुसरीकडे शासनाकडून सुद्धा अशा प्रकारचे शेतकऱ्याचे हाल होताना पाहायला मिळते.
(संपादन - विवेक मेतकर)