पाण्यासाठी पाण्यात राहून अभिनव आंदोलन, वाचा काय आहे प्रकार

विवेक मेतकर
Thursday, 17 September 2020

जिल्ह्यातून वाहत असलेल्या पुर्णानदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दुषीत होत आहे. नदीकाठी असलेल्या गावांना पुर्णानदी हा जलस्त्रोत असल्याने मानवी तसेच पशुधनांसाठी पिण्याचे पाणी म्हणून वापर करण्याशिवाय उपाय नाही. कारण हा भाग खारपाण पट्यात असल्याने भुगर्भातील पाणी पिण्यायोग्य नाही, अशी परिस्थीतीत असतांना लोकांना दुषीत पाणी पिण्यासाठी वापरावे लागते आहे. या दुषीत पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न सुध्दा केले आहे. मात्र, शासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.

अकोला : जिल्ह्यातून वाहत असलेल्या पुर्णानदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दुषीत होत आहे. नदीकाठी असलेल्या गावांना पुर्णानदी हा जलस्त्रोत असल्याने मानवी तसेच पशुधनांसाठी पिण्याचे पाणी म्हणून वापर करण्याशिवाय उपाय नाही. कारण हा भाग खारपाण पट्यात असल्याने भुगर्भातील पाणी पिण्यायोग्य नाही, अशी परिस्थीतीत असतांना लोकांना दुषीत पाणी पिण्यासाठी वापरावे लागते आहे. या दुषीत पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न सुध्दा केले आहे. मात्र, शासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.

दूषित पाणी हे अमरावती जिल्ह्यातील एमआयडीसीच असून अंबा नाल्यातून पूर्णा नदीत प्रक्रियाविना सोडण्यात येत आहे. पुर्णा नदीचे पाणी गेल्या अनेक वर्षा पासून दुषित होत असले तरी अलिकडच्या काळात जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. अकोला, नागपुर स्थीत नीरी संस्था, अकोला जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, उपप्रादेशिक प्रदुषण मंडळ कार्यालय, अकोला, ग्रामिण पाणी पुरवठा जि.प. अकोला इत्यादी विभागांना सुध्दा हा विषय हाताळला असला तरी प्रत्यक्षात काहीच कार्यवाही केलेली नाही.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

शासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने नाईलाजस्तव गणेश पोटे यांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारला”२०१४ मध्ये पुर्णा नदीचे पाणी दुषित असल्याचे आढळले होते. दुषित पाण्याच्या नमुन्यात रासायनिक घटक असल्याचे समोर आले आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळ यांनी अमरावती येथील औद्योगीक वसाहतीचे पाणी पुर्णानदीच्या पात्रात मिसळल्याने पाणी प्रदुषित झाल्याचा निर्वाळा दिला.

लाखपुरी, दातवी, भटोरी, पारद, सांगवामेळ, पुंगशी, मुंगशी, विरवाडा, म्हैसांग, कट्यार, वडद, कपिलेश्वर, काटी, पाटी, किनखेड, नेर धामणा, गोपाळखेड, गांधीग्राम, केळीवेळी, दोनवाडा इत्यादि गावांच्या नागरीकांना व गुरांना दुषित पाणी प्यावे लागत आहे.

मात्र, प्रदूषण मंडळाच्या खाबूगिरीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.पुर्णा नदीचे पाणी दुषित होण्यापासून वाचवण्यासाठी अमरावती एम.आय.डी.सी.चे पाणी पुर्णा नदीत सोडण्यापुर्वी त्यावर प्रक्रीया करावी आणि नागरिकांच्या जीवनाशी सुरू असलेला हा जीवघेणा खेळ थांबवावा,अशी आंदोलन कर्त्यांसह गावकऱ्यांची मागणी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news: Ganesh Potes agitation in water to stop increasing water pollution