व्हीसीद्वारेच होणार सर्वसाधाराण सभा, प्रशासनाची तयारी सुरू

सुगत खाडे  
Monday, 14 September 2020

 जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (ता. १४) होणार आहे. शासनाने सभेच्या आयोजनावर निर्बंध घातल्यामुळे सर्वसाधारण सभा ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी- अर्थात दूरचित्र संवादाद्वारे) हाेणार आहे.

अकोला : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (ता. १४) होणार आहे. शासनाने सभेच्या आयोजनावर निर्बंध घातल्यामुळे सर्वसाधारण सभा ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी- अर्थात दूरचित्र संवादाद्वारे) हाेणार आहे.

सभेच्या विषय पत्रिकेवर नऊच विषय ठेवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र वेळेवर विषय सादर करण्यात येतील. दरम्यान सभेच्या आयोजनाची प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाची वाढता धोका लक्षात घेता शासनाने जिल्हा परिषदेच्या बैठकांवर निर्बंध लावले आहेत. त्याअंतर्गत सभा, बैठकका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गत महिन्यात जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची पहिली ऑनलाईन सभा २ सप्टेंबर राेजी पार पडली हाेती. मात्र इंटरनेटच्या अडथळ्यांमुळे ऑनलाईन सभेचा बाेजवारा उडाला हाेता. माहितीची व्यवस्थित देवाण-घेवाणच हाेऊ शकली नव्हती. दरम्यान आता साेमवारी (ता. १४) हाेणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऑनलाईन सभेला विरोध; स्थायीत घेतला हाेता ठराव
विषय समित्या व इतर सभा ऑनलाईन पद्धतीने न घेण्याचा ठराव २ सप्टेंबर राेजी झालल्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला हाेता. परंतु या संबंधिताच्या ठरावाचा प्रस्ताव शासनाकडे गेला नसल्याने साेमवरची सभा ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे.

या विषयांवर होईल चर्चा
सर्वसाधारण सभेच्या नाेटीसवर एकूण ९ विषय नमूद करण्यात आले आहेत. यात ११ जून राेजीच्या सभेचे इतिवृत्त मंजूर करणे, पांढुर्णा येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाची निविदा स्वीकृत करणे, खांबोरा ६० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योनेची सुधारणात्मक जोडणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करुन काम पूर्ण झाल्यावर देखभाल दुरुस्तीसाठी योजना जिल्हा परिषदेने ताब्यात घेणे, बाळापूर व अकाेला तालुक्यासाठी ६९ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेसाठी अंदाजपत्रक तयार करणे, जिल्हा परिषद सदस्यांचे प्रवास व बैठक भत्ता यामध्ये वाढ करण्याची शिफारस करणे, तेल्हारा तालुक्यातील खापरखेड येथील अंगणवाडीची शिकस्त इमारती पाडण्याचा ठराव मंजूर करणे आदींचा समावेश आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: General meeting to be held by VC, administration begins preparations