esakal | पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले, कामचुकार कृषी सेवकांवर कारवाई करा!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Guardian Minister Bachchu Kadu said, take action against unskilled agricultural workers!

राज्य व केन्द्र शासनाच्या दिव्यांगासाठी असलेल्या विविध योजनेचा एकत्रीकरण करुन त्यांची सागळ घालून दिव्यांगाना रोजगार व उद्योगक्षम बनवा, असे प्रतिपादन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.

पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले, कामचुकार कृषी सेवकांवर कारवाई करा!

sakal_logo
By
सुगत खाडे

अकोला : राज्य व केन्द्र शासनाच्या दिव्यांगासाठी असलेल्या विविध योजनेचा एकत्रीकरण करुन त्यांची सागळ घालून दिव्यांगाना रोजगार व उद्योगक्षम बनवा, असे प्रतिपादन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात दिव्यांगासाठी राखीव असलेल्या पाच टक्के निधीचा आढावा शुक्रवारी (ता. ४) पालकमंत्री कडू यांनी घेतला. ग्रामनिहाय दिव्यांगाचे वर्गीकरण करावे. अंध, अस्थीव्यंग तसेच बहूविकलांग, असे गट तयार करुन त्यांचा तालुकानिहाय संघ तयार करावा.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यांचा बचत गट निर्माण करावा. त्यांना कोणता लाभ मिळू शकतो याचे सूक्ष्म नियेाजन करावे. शासनाच्या विविध योजनाची सांगड घालून दिव्यांगाना रोजगार व उद्योग मिळवून द्यावा, असे सांगून दिव्यांगासाठी रोजगारयुक्त गाव ही योजना राबवावी. अनेक ग्रामपंचायतींनी तसेच नगरपालिकांनी गत अनेक वर्षांपासून दिव्यांगासाठी असलेला निधी खर्च केलेला नाही. अशा ग्रामपंचायतीने अखर्चीत निधी त्वरीत खर्च करावा, तसेच सन २०२०-२१ चा अपंग कल्याणाचा निधी डिसेंबर अखेरपर्यंत खर्च करावा, असे निर्देश कडू यांनी संबंधिताना दिले.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.एस. वसतकर, वैद्यकीय साजाजिक कार्यकर्ता डी.एम.पुंड आदी उपस्थित होते.

कामचुकार कृषी सेवकांवर कारवाई करा!
स्व. नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प योजना (पोकरा) ही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारी योजना आहे. सदर योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना पोहचविण्यासाठी विविध स्तरावर असलेली सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढा. गाव विकासाच्या या योजनेसाठी काम न करणाऱ्या कृषी सेवकावर कारवाई करा, अन्यथा मी तालुका कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करेल, असा इशारा यावेळी पोकरा योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत पालकमंत्र्यांनी दिला. पोकरातील सर्व लाभांच्या योजनांचे वर्गीकरण करावे. त्याची परिपूर्ण अंमलबजावणी करावी, असे सुद्धा त्यांनी बैठकीत सांगितले.
(संपादन - विवेक मेतकर)

loading image