वीज देयक माफीसाठी हल्लाबाेल आंदाेलन

सुगत खाडे  
Wednesday, 9 September 2020

कोरोना काळात संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे घरामध्येच राहणाऱ्या नागरिकांना सरकारने विज देयक माफ करुन दिलासा द्यावा, या मागणीसाठी युवा मुक्ती आंदाेलन संघटनेतर्फे मंगळवारी (ता. ८) महावितरण कार्यालयासमाेर निदर्शने करण्यात आली. संघटनेतर्फे करण्यात या हल्लाबाेल आंदाेलनात अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. वीज माफिचा निर्णय न झाल्यास तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला.
 

अकोला :  कोरोना काळात संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे घरामध्येच राहणाऱ्या नागरिकांना सरकारने विज देयक माफ करुन दिलासा द्यावा, या मागणीसाठी युवा मुक्ती आंदाेलन संघटनेतर्फे मंगळवारी (ता. ८) महावितरण कार्यालयासमाेर निदर्शने करण्यात आली. संघटनेतर्फे करण्यात या हल्लाबाेल आंदाेलनात अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. वीज माफिचा निर्णय न झाल्यास तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला.

कोरोनामुळे आर्थिकदृष्टया सामान्यांचे कंबरडे माेडले असतानाच महावितरण कंपनीने ग्राहकांना माेठ्या रक्कमेची देयके दिली. मात्र तरीही सरकारला जाग येत नसल्याने युवा मुक्ती आंदाेलन संघटनेतर्फे आंदाेलन करण्यात आले. देयकाची सक्ती करण्यात येऊ नये, अशीही मागणी करण्यात आली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

देयकांच्या तपासणीसाठी समिती गठित करण्याची मागणी युवा मुक्ती आदाेलन संघटनेतर्फे करण्यात आली. आंदाेलनात मनाेज भालेराव, चंदू अग्रवाल, स्वप्निल खिल्लारे, सागर शंभरकर, राेहित बनसाेड, राेहित डाेईफाेडे, विजय सावंत, सूरज वाडेकर, प्रदीप कांबळे, आशिष बनसाेड, सुनिता सिरसाट, सनी तिरपुडे, संदीप भांबाेरे, अंकुश गावंडे, राेहित बाेरकर, अजिंक्य सूर्यवंशी, अमाेल गणवीर आदी सहभागी झाले हाेते.

या मागण्यांकडे वेधले लक्ष

  • काेराेना संकटाच्या काळात १०० युनीटच्या आतील देयक माफ करण्यात यावे.
  • १०१ ते ३००पर्यंतचे युनिट देयकही माफ करण्यात यावे.
  • सर्वत्र १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत कडक टाळेबंदी असल्याने वीज देयक माफ करण्यात यावे आणि त्या नंतरचे ५० टक्के देयक माफ करण्यात यावे.
  • १ एप्रिल ते ३० ऑगस्ट या कालावधीतील ३०१ ते ६०० युनीटपर्यंतचे देयक ५० टक्के माफ करण्यात यावे.
  • वीज देयकातील वहन व वीज शुल्क १६ टक्के आकारणी अवाढव्य असल्याने ती माफ करण्यात यावी.
    (संपादन - विवेक मेतकर)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Hallabol agitation for electricity bill waiver