esakal | स्नेहाच्या शैक्षणिक मदतीला धावले माणुसकीचे हात !
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Hands of humanity rushed to Snehas educational help!

सामाजिक बांधिलकीचे भाव ठेवत देऊळगाव माळी येथील ग्रामस्थांनी विद्युत शॉक लागून मृत्यू पावलेल्या सपना विलास गवई या महिलेल्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली.

स्नेहाच्या शैक्षणिक मदतीला धावले माणुसकीचे हात !

sakal_logo
By
संतोष थोरहाते

हिवरा आश्रम (जि.बुलडाणा) ः सामाजिक बांधिलकीचे भाव ठेवत देऊळगाव माळी येथील ग्रामस्थांनी विद्युत शॉक लागून मृत्यू पावलेल्या सपना विलास गवई या महिलेल्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली.


मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील सपना गवई या महिलेचा ता.२७ सप्टेबरला विद्युत शॉक लागून मृत्यू झाला होता. गवई या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे.

या कुटुंबातील स्नेहा विलास गवई हिच्या शैक्षणिक भविष्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास राऊत यांनी सोशल मीडियावर केले.

स्नेहाच्या नावाने सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये खाते सुद्धा काढून दिले. कैलास राऊत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देऊगावमाळी येथील गावकऱ्यांनी स्नेहाच्या बँक खात्यामध्ये आर्थिक मदत जमा केली. यामध्ये प्रकाशभाऊ डोंगरे मित्र मंडळ, डॉ.विशाल वसंतराव मगर, बळी नाथगिरी महाराज, डॉ.अमोल गवई, नारायण बळी, सावरकर सर, पांडुरंग कृपा भजनी मंडळ अध्यक्ष जगन्नाथ चांगाडे, पांडुरंग संस्थानचे अध्यक्ष टी.एल मगर तसेच इतर गावकऱ्यांनी मदत करून चिमुकलीच्या खात्यामध्ये पैसे जमा केले.

गजेंद्र गवई ,पत्रकार कैलास राऊत त्यांनी केलेल्या आवाहनानुसार एकूण ६५ हजार रुपयांची आर्थिक या कुटुंबाला मिळाली. यावेळी गावकऱ्यांनी स्नेहाचे वडील विलास गवळी यांच्याकडे आर्थिक मदतीची रक्कम सुपूर्द केली. यावेळी पत्रकार कैलास राऊत, नारायण बळी, वसंतराव मगर, पुरूषोत्तम बळी महाराज, प्रकाश डोंगरे, भिकाजी गवई, सुरेश गवई, दत्ता राऊत, अनिल गायकवाड उपस्थित होते.


स्नेहाच्या शैक्षणिक आधारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन सोशल मिडीयाच्या माध्यमातून करण्यात आले. ग्रामस्थांनी सुद्धा सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत आर्थिक मदती केली. स्नेहाला आर्थिक मदतीचा हात देवून समाजातील दानशुरांनी आर्थिक मदत करावी.
-कैलास राऊत, अध्यक्ष तरुणाई फाऊंडेशन देऊळगाव माळी

(संपादन - विवेक मेतकर)