अकोट तालुक्यात कोरोनाचा कहर:24 तासात तब्बल 33 रुग्ण कोरोना बाधित

मुकुंद कोरडे
Monday, 20 July 2020

तालुक्यात कोरोना व्हायरसने मोठा कहर केला आहे. आज विक्रमी  कोरोनाचे ३३ नवीन रुग्ण आज आढळून आल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.  कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १६४ वर पोहचली आहे. यापैकी २९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

अकोट (जि.अकोला) : तालुक्यात कोरोना व्हायरसने मोठा कहर केला आहे. आज विक्रमी  कोरोनाचे ३३ नवीन रुग्ण आज आढळून आल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.  कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १६४ वर पोहचली आहे. यापैकी २९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला १२७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.

आज १९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आलेल्या अहवालात पालिका हद्दीत १७ तर ग्रामीण भागात १६ रुग्णांची वाढ झाली आहे,(१८जुलै रात्री ९ वाजता पासून तर १९ जुलै सकाळ पर्यंत) अकोट शहरात आढळून आलेल्या रूग्णांपैकी २८ रुग्ण हे शासकीय आदिवासी आश्रमशाळा पाटसुल येथील अलगिकरण मधले असून ,३ रुग्ण शहरातील श्रीहरी फूड  पार्क  या अलगिकरण केंद्रातील आहे, त्यामुळे एकूण ३१ बाधित हे अलगिकरण मधले आहेत तर , २ रुग्ण हे नव्याने बाधित झाले आहे,

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

अकोट शहरात बाधितां मध्ये 
१)यात्रा चौक अकोट येथील ५०वर्षीय पुरुष,
२)तळोकार पुरा २२ वर्षीय तरुण 
३) शनिवारा ४२ वर्षीय महिला
४)रामटेक पुरा २३ वर्षीय तरुणी
५) अण्णा भाऊ साठे नगर ४५ वर्षीय महिला
६)अण्णा भाऊ साठे नगर ४६   वर्षीय पुरुष
७)अण्णा भाऊ साठे नगर ४४वर्षीय महिला
८)इफतेखार प्लॉट ३३वर्षीय पुरुष
९)इफतेखार प्लॉट  ३८ वर्षीय महिला
(वरील सर्व अहवाल १८ जुलै रात्री ९ वाजता प्राप्त)
१०)  शनिवारा अकोट ६० वर्षीय पुरुष
११) सिंधी कॅम्प ४३ वर्षीय महिला
१२)सिंधी कॅम्प २२ वर्षीय तरूण
१३)इंदिरा नगर ३५ वर्षीय महिला
१४)इंदिरा नगर १७ वर्षीय युवक
१५)इंदिरा नगर ६० वर्षीय महिला
१६) ढोर पुरा ५५ वर्षीय पुरुष
१७)सिंधी कॅम्प १९ वर्षीय युवक
(वरील सर्व अहवाल १९ जुलै सकाळी प्राप्त)

महाबीजचे पत्र म्हणजे, स्वत:ची कातडी वाचविण्याचा प्रयत्न! : रविकांत तुपकर

तर ग्रामीण भागात कोरोनाचा सर्वत्र शिरकाव झाला असून तालुक्यातील वडाळी, अकोली जहाँ, पिंपळखुटा, करोडी येथे तब्बल १६ रुग्ण आढळून आले आहेत, यामध्ये
१) वडाळी सटवाई २५ वर्षीय तरुणी
२) अकोली जहाँ २९ वर्षीय युवक
३) अकोली जहाँ ३६ वर्षीय महिला
४) पिंपळखुटा २१ वर्षीय युवक
(वरील सर्व अहवाल १८जुलै रात्री ९ वाजता पर्यंत)
५)पिंपळखुटा २७ वर्षीय युवक
६) करोडी ३५ वर्षीय पुरुष
७)करोडी ३४ वर्षीय पुरुष
८)करोडी ३३ वर्षीय पुरुष
९)करोडी ७८ वर्षीय महिला
१०)करोडी २५ वर्षीय युवक
११)करोडी ५१ वर्षीय महिला
१२)करोडी १९ वर्षीय युवक
१३)पिंपळखुटा २६ वर्षीय तरुणी
१४)पिंपळखुटा ५२ वर्षीय महिला
१५)पिंपळखुटा ५५ वर्षीय पुरुष
१६) अकोली जहाँ ५० वर्षीय पुरुष 
(वरील सर्व अहवाल १९ जुलै सकाळी प्राप्त)

अकोट शहरात एकूण १२० रुग्ण कोरोना बाधित असून ,५ जणांचा मृत्यू झाला आहे, एकूण २६ लोकांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज दिले असून एकट्या अकोट शहरात सध्या ८९ रुग्ण कोरोना बाधित आहेत, तर ग्रामीण भागात एकूण ४४ रुग्ण कोरोना बाधित असून ,३ जणांचा मृत्यू झाला आहे, एकूण ३ लोकांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज दिले असून  ग्रामीण भागात सध्या ३८ रुग्ण कोरोना बाधित असल्याची माहिती स्थानिक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे,

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news Havoc of corona in Akot taluka: 33 patients infected with corona in 24 hours