आता हेल्मेट सक्ती दिवाळीनंतर

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 4 November 2020

शहरात पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी ६ नोव्हेंबर पासून दुचाकी वाहन धारकांना हेल्मेट ची सक्ती करण्याचा काल आदेश जारी केला होता.  

अकोला :  शहरात पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी ६ नोव्हेंबर पासून दुचाकी वाहन धारकांना हेल्मेट ची सक्ती करण्याचा काल आदेश जारी केला होता.  

परंतु याविषयावर वृत्तपत्रे व सोशल मीडिया वर नागरिकांनी व्यक्त केलेल्या विरोधाच्या प्रतिक्रियांची पोलीस अधीक्षकांनी वेळीच दखल घेतली असून आता शहारत हेल्मेट सक्तीची अमलबजावणी दिवाळी नंतर केली जाणार आहे असे वाहतूक शाखेचे प्रमुख पो नी गजानन शेळके यांनी सांगितले.

मात्र शहराचे बाहेरील सर्व राज मार्ग व राष्ट्रीय मार्गावर दुचाकी वाहन धारकांना ६ नोव्हेंबर पासून हेल्मेट ची सक्ती राहणार आहे, असे पो नी शेळके यांनी सांगितले आहे.

 नागरिकांच्या शहरातील हेल्मेट सक्तीला विरोधाची दखल तात्काळ घेतल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आभार अकोलेकरांनी मानले , परंतु दिवाळी पूर्वी शहरातील रस्त्यांची दुर्दशा आधी दूर करून रस्त्यांची सुधारणा करावी , रहदारी विभागातर्फे प्रमुख रस्त्यावर सिग्नल ची व्यवस्था करावी , शहरात वाहन पार्किंग ची व्यवस्था करावी , झेब्रा क्रॉसिंग व पिवळे पट्टे रस्त्यावर टाकावे , सर्व रस्त्यांची सुधारणा झाल्यावर च शहरात हेल्मेट सक्ती संदर्भात विचार करावा अशी नागरिकांची मागणी आहे 

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Helmet forced now after Diwali