कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पाच तासात निगेटीव्ह कसा,  कोरोना मुक्तीचा धारावी पॅटर्न राबविण्याची गरज

भगवान वानखेडे
Monday, 13 July 2020

जिल्ह्यात कोरोना रुग्ण तपासणी करीता प्राप्त झालेल्या रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेले रुग्ण अवघ्या पाच तासात निगेटिव्ह येत असल्याने जिल्ह्यात पॉझिटिव्ह म्हणून जाहीर केललेले रुग्ण खरेच पॉझिटिव्ह आहेत का, अशी शंका निर्माण करणारे दोन प्रकरणे उघडकीस आली. त्यामुळे हा सावळा गोंधळ काय आहे, याचा खुलासा जिल्हा प्रशासनाने करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.

अकोला  ः जिल्ह्यात कोरोना रुग्ण तपासणी करीता प्राप्त झालेल्या रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेले रुग्ण अवघ्या पाच तासात निगेटिव्ह येत असल्याने जिल्ह्यात पॉझिटिव्ह म्हणून जाहीर केललेले रुग्ण खरेच पॉझिटिव्ह आहेत का, अशी शंका निर्माण करणारे दोन प्रकरणे उघडकीस आली. त्यामुळे हा सावळा गोंधळ काय आहे, याचा खुलासा जिल्हा प्रशासनाने करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.

दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने अकोला जिल्ह्यासाठी ही धोक्‍याची घंटा ठरत आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अगदी काल परवा अकोट तालुक्‍यात कावसा आणि अकोली जहांगीर येथे सापलेल्या दोन रुग्णांचे रॅपिड टेस्ट अहवाल स्वॅब टेस्टमध्ये निगेटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यांचे नातेवाईकांना देखील पाटसूळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात विलगीकरणात ठेवण्यात आले. परंतु अवघ्या पाच तासात झालेल्या दुसऱ्या तपासणीत हा रुग्ण निगेटिव्ह जाहीर करण्यात आला. त्यास त्याचे नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

असाच दुसरा प्रकार कावसा येथे उघडकीस आला. रॅपिड टेस्ट किट मधील तपासणीत एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर करून त्यास अकोला येथे हलविण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्याचा स्वाब नमुना घेण्यात आला व तिसऱ्याच दिवशी हा रुग्ण निगेटीव्ह असल्याचे जाहीर करण्यात आले. रॅपिड टेस्ट किट सदोष आहेत की स्वाब टेस्ट करणारी यंत्रणा याचा खुलासा जिल्हा प्रशासनाने तातडीने करावा, अशी मागणी वंचितने केली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news How Corona Positive Patient Negative in Five Hours, The need to implement the Dharavi pattern of corona liberation