
एकीकडे प्रशासन कोरोना विषाणू कोविड-१९ ची दुसरी लाट थोपविण्यासाठी उपाययोजना करीत आहे. त्याचवेळी नागरिकांचा बेशिस्त पणा दुसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर सर्वत्र बेलगाम झालेली वाहतूक रस्त्यावर बघावयास मिळत आहे.
अकोला : एकीकडे प्रशासन कोरोना विषाणू कोविड-१९ ची दुसरी लाट थोपविण्यासाठी उपाययोजना करीत आहे. त्याचवेळी नागरिकांचा बेशिस्त पणा दुसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर सर्वत्र बेलगाम झालेली वाहतूक रस्त्यावर बघावयास मिळत आहे. त्यात बेशिस्त ऑटोचालक आणि अवैध वाहतुकीचा उत आला असून, शहरासह जिल्ह्यातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. यंत्रणांनाही हे अवैध वाहतुकदार जुमानत नसल्याची स्थिती आहे. अकोला शहरातील मुख्य रस्ता असलेल्या अशोक वाटिका ते रेल्वे स्थानकादरम्यान उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. याच रस्त्याने शहरातील ६० टक्के वाहतूक सुरू असते. शहरातील ६० टक्केपेक्षा अधिक ऑटोही याच रस्त्यावर धावतात. अकोटककडे जाणारा राज्य मार्ग असल्याने व कृषी उत्पन्न बाजार समिती, रेल्वे मालधक्काही याच मार्गावर असल्याने जड वाहतुकही सुरू असते. हेही वाचा - अरे बापरे! प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी याच मार्गावर दोन्ही बस स्थानक आहे. प्रमुख हॉटेल व शाळा, मंगल कार्यालयेही याच रस्त्यावर आहेत. त्यामुळे दररोज या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होताना दिसते. त्याला नियंत्रित करणारी यंत्रणा गुंतलेली बघून अवैध वाहतुकदारांनी आपला मोर्चा शहराच्या मध्यवर्ती भागातील या रस्त्याच्या बाजूने असलेल्या उपरस्त्यांकडे वळविला आहे. बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या निंबोळ्या गल्लीतून ट्रॅव्हल्स सारखी खासगी बस वाहने दररोज धावत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. बस स्थानकातून बाहेर पडणारी वाहतूक आणि अवैध वाहतूक यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. हेही वाचा - शिक्षक मतदारसंघ: सर्वच समस्यांना अचानक फुटले तोड, निवडणूकीच्या रणधुमाळीत प्रत्येकाचा दावा आता थेट बस स्थानकापासूनच प्रवाशी वाहतूक परवानगीशिवाय सुरू आहे वाहतूक हेही वाचा - कार्तिकस्वामींचे एकमेव मंदीर मूर्तिजापूर येथे कारवाई सुरू रस्ता सुरक्षा समितीच्या शिफारशी दुर्लक्षित हेही वाचा - प्रलोभणे दाखवून व्यभिचार करीत सत्तेत येण्याचा भाजपचा प्रयत्न - जयंत पाटील ऑटो थांब्यासाठी २० जागांची शिफारस या जागांची केली शिफारस हेही वाचा - आत्महत्येच्या प्रयत्नांनंतर शेतकऱ्यांना मिळणार भूसंपादनाचा वाढीव मोबदला -ऑटो सँड संदर्भात जूनपासून पाठपुरावा सुरू आहे. एसपी साहेब यांचे सहीचे पत्र सुद्धा दिले. चार दिवसांपूर्वी प्रत्यक्ष मनपा आयुक्तांना भेटून माहिती दिली. ऑटो स्टँड मिळाले तर ऑटोवाल्यांना काही प्रमाणात का होईना शिस्त लावण्यासाठी मदत होईल. ऑटो स्टँड शिवाय उभे राहणारे ऑटो चालान करता येतील. (संपादन - विवेक मेतकर) |
|||