Bharat Band Updates :स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मलकापूर येथे अडविली रेल्वे, आमदारांनी अडवला हायवे

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 8 December 2020

नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने आज, म्हणजेच 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारण्यात आला आहे. 

बुलडाणा: नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने आज, म्हणजेच 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारण्यात आला आहे. 

गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.

शेतकऱ्यांच्या भारत बंदला बुलढाणा जिल्ह्यात जोरदार सुरुवात झाली आहे. 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांसह चेन्नई -  अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस मलकापूर रेल्वे स्थानकावर रोखली आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारने तात्काळ तोडगा काढावा यासाठी बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आज सकाळ पासून रस्त्यावर उतरली आहे.

सकाळी 6.40 वा. चेन्नई -  अहमदाबाद एक्सप्रेस रोखून रविकांत तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी रविकांत तुपकरांसह शेकडो  कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे..

नांदुरा - आमदार एकडे यांनी अडविला राष्ट्रीय महामार्ग
राष्ट्रीय महामार्ग क्र 6 नांदुरा येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वात अडवला, गेल्या एक तासापासून महामार्ग ठप्प, वाहतून खोळंबली, नांदुरा येथे केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी, जवळपास 500 कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. 

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: India closed; Swabhimani Shetkari Sanghatana Advali Railway at Malkapur