खासदार, आमदारांना कांद भेट देवून अभिनव आंदोलन

सुगत खाडे  
Wednesday, 16 September 2020

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यामुळे मंगळवारी (ता. १५) शेतकरी संघटनने आक्रमक पवित्रा घेत महामार्गावर कांदा जाळून निषेध केला. निर्यादबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास भाजप खासदार, आमदारांना कांदा भेट देऊन अभिनव पद्धतीने आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा सुद्धा शेतकरी संघटनेने दिला आहे.

अकोला :  केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यामुळे मंगळवारी (ता. १५) शेतकरी संघटनने आक्रमक पवित्रा घेत महामार्गावर कांदा जाळून निषेध केला. निर्यादबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास भाजप खासदार, आमदारांना कांदा भेट देऊन अभिनव पद्धतीने आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा सुद्धा शेतकरी संघटनेने दिला आहे.

कांद्याने आठवडाभरात सरासरी दोन हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. आणखी भाववाढीच्या भितीच्या नावाखाली केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा आदेश जारी केला. गत वर्षीच २९ सप्टेंबर २०१९ रोजी निर्यातबंदी केल्यानंतर ती यंदा फेब्रुवारीत उठवण्यात आली होती. आठ महिन्यांत पुन्हा निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यामुळे मंगळवारी (ता. १५) शेतकरी संघटनेने हुतात्मा चाैकात कांद्याचे दहन करुन सरकारच्या निर्यातबंदीचा विराेध केला. आंदाेलनात शेतकरी संघटनेचे पदाधिकारी विलास ताथाेड, धनंजय मिश्रा, डाॅ. निलेष पाटील, अजय गावंडे, मधुकर गायकवाड, सचिन काेकाटे आदी सहभागी झाले हाेते.

सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधात
कांदा निर्यातबंदी करुन सरकारने कांद्याचे भाव पाडण्याचा डाव आखल्याचा आराेप शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. निर्यातबंदी हाेताच २७ रुपयांचा दर ७-८ रुपयांवर आला आहे. हा दर आणखी कमी झाल्यास शेतकऱ्यांवरील कर्जाचा डाेंगर आणखी वाढेल. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Innovative agitation by giving onions to MPs and MLAs