esakal | ‘दर्शन’ गाजवणार आयपीएल स्पर्धा!, किंग्स इलेवन पंजाबमध्ये तिसऱ्यांदा निवड!
sakal

बोलून बातमी शोधा

 akola news IPL tournament to be held in Darshan nalkande !, Kings XI Punjab selected for the third time!

अकोला क्रिकेट क्लब व विदर्भ क्रिकेट संघटनेचा मध्यमगती गोलंदाज व आक्रमक फलंदाज असा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू दर्शन नळकांडेची ९ एप्रिल २०२१ पासुन सुरू होणाऱ्या आय.पी.एल. स्पर्धेकरिता किंग्स इलेवन पंजाब संघात निवड झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

‘दर्शन’ गाजवणार आयपीएल स्पर्धा!, किंग्स इलेवन पंजाबमध्ये तिसऱ्यांदा निवड!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला   ः  अकोला क्रिकेट क्लब व विदर्भ क्रिकेट संघटनेचा मध्यमगती गोलंदाज व आक्रमक फलंदाज असा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू दर्शन नळकांडेची ९ एप्रिल २०२१ पासुन सुरू होणाऱ्या आय.पी.एल. स्पर्धेकरिता किंग्स इलेवन पंजाब संघात निवड झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

सदर निवडीनंतर किंग्स एलेवेन पंजाब संघाचे प्रशिक्षक तथा भारताचे माझी कर्णधार अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनात बी.सी.सी.आय.चे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानावर सुरू झालेल्या सरावाकरिता दर्शन मुंबई इथे रवाना झाला आहे. दर्शनची यावर्षी होणाऱ्या आय.पी.एल. स्पर्धेकरिता सलग तिसऱ्यांदा किंग्स इलेवन पंजाब संघात निवड झाली आहे. यावर्षी आय.पी.एल. स्पर्धेत दर्शन प्लेइंग इलेवनमध्ये खेळण्याची संधी मिळेल, अशी आशा आहे. वयाच्या ८ वर्षांपासून अकोला क्रिकेट क्लब येथे खेळास सुरूवात करणाऱ्या दर्शनने यापूर्वी वयोगट १४, १६, १९, २३ स्पर्धेत विदर्भ तथा मध्यविभाग संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. १९ वर्षीय भारतीय संघाकडून इंग्लंड येथे कसोटी सामना तर आशिया कप करिता मलेशिया येथे १५ वर्षीय भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे, तर तीन वर्षांपासून रणजी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. दर्शनच्या निवडी बद्दल त्यांचे अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानूभाई पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिव विजय देशमुख, सहसचिव कैलाश शहा, ऑडीटर दिलीप खत्री, कर्णधार भरत डिकर, सदस्य ॲड. मन्ना खान, गोपाळराव भिरड, शरद अग्रवाल, माझी कर्णधार विवेक बिजवे, क्रीडा परिषद सदस्य जावेद अली, परिमल कांबळे, रणजी खेळाडू रवी ठाकूर, प्रशिक्षक सुमेद डोंगरे, अमित माणिकराव, पवन हलवणे, शारिक खान, देवकुमार मुधोळकर, एस.टी. देशपांडे, किशोर धाबेकर तसेच अकोला क्रिकेट क्लब व जिल्हा हौशी क्रिकेट संघटना अकोलाच्या खेळाडूंनी अभिनंदन करून स्पर्धेकरित शुभेच्छा दिल्या.
----------------
क्लबचे नाव अंतरराष्ट्रीय स्तरावर
गत ७ - ८ वर्षांपासून क्लबच्या खेळाडूंनी अकोला क्रिकेट क्लव, जिल्हा तथा विदर्भाचे नाव राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर नेले असून ही बाब अकोला क्रिकेट क्लब व जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेट खेळाकरिता प्रेरणादायी असून त्यांच्या आत्मविश्वासात भर टाकणारी आहे. दर्शनची निवड ही विदर्भ, जिल्हा व क्लव करीता अभिमास्पद बाब असल्याची माहिती अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार तथा विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी दिली.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image