सरपंचपदाची आरक्षण सोडत ८ डिसेंबरला

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 26 November 2020

 सन २०२० ते २०२५ दरम्यान अकोला जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीव्दारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करावयाचे आहे.

अकोला : सन २०२० ते २०२५ दरम्यान अकोला जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीव्दारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करावयाचे आहे.

त्याकरिता ता.८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. तहसीलस्तरावर तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील अनुसूचित जाती, जमाती तसेच नागरिकांचा मागास प्रवर्गामधील व्यक्तीकरिता सरपंचाची पदे आरक्षित करण्याकरिता आरक्षण सोडत काढण्यात येत आहे.

हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

अनुसूचीत जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्गातील स्त्रीयाकरिता आरक्षणाची सोडत जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोडत घेण्यात येणार आहे.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

तहसील कार्यालय अकोटची आरक्षण सोडत सकाळी ११ वाजता, तेल्हाराची सकाळी ११.३० वा., बाळापूरची दुपारी १२ वा., पातुरची १२.३० वा., मूर्तिजापूरची दुपारी १ वा., बार्शीटाकळीची आरक्षण सोडत दुपारी १.३० वाजता, तर अकोलाची आरक्षण सोडत दुपारी २ वाजता होणार आहे. सर्व नागरिकांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी सोडतीस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Leaving reservation for Sarpanch post on 8th December