esakal | दारू पिऊन घरी आलेल्या व्यक्तीला समुहाने मारहाण, नगराध्यक्षांसह 25 जणांवर दंगलीचे गुन्हे
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Malkapur mayor Harish Rawal and 25 others were charged with rioting

दारू पिऊन घरी आलेल्या व्यक्तीला समुहानेव मारहाण केल्याप्रकरणी मलकापूरचे नगराध्यक्ष ॲड. हरिश रावळ यांच्यासह २५ व्यक्तींवर बुधवारी रात्री विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे.

दारू पिऊन घरी आलेल्या व्यक्तीला समुहाने मारहाण, नगराध्यक्षांसह 25 जणांवर दंगलीचे गुन्हे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

मलकापूर (जि.बुलडाणा) : दारू पिऊन घरी आलेल्या व्यक्तीला समुहाने मारहाण केल्याप्रकरणी मलकापूरचे नगराध्यक्ष ॲड. हरिश रावळ यांच्यासह २५ व्यक्तींवर बुधवारी रात्री विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे.


शहरातील शिवाजी नगर येथील रहिवासी किरण साळुंके हा मंगळवारी रात्री नऊ वाजता नगराध्यक्ष अँड. रावळ यांच्या घरी पाेहचला. दारूच्या नशेत असल्याने त्याने शिवीगाळ केली. त्याला समजावण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्याने धमकी देऊन घरात घुसण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे त्याला ॲड. रावळ, प्रमोद उज्जैनकर, निरंजन लेले, संतोष उज्जैनकर यांच्यासह २५ व्यक्तींनी जबर मारहाण केली. त्यावेळी पोलिस उभे असताना त्यांनाही न जुमानता बेकायदेशिरपणे मंडळी जमवून हा प्रकार सुरूच ठेवला.

त्यामध्ये जखमी झालेल्या किरण साळुंके यांनी पाेलिसात तक्रार दिली. त्यावरून शहर पोलिसांनी भादंविच्या विविध कलमान्वये बुधवारी रात्री गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास ठाणेदार कैलास नागरे करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)