अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक

akola news Manoj Raut, son of a smallholder farmer, became Sub-Inspector of Police
akola news Manoj Raut, son of a smallholder farmer, became Sub-Inspector of Police
Updated on

दानापूर(जि. अकोला)  ः तेल्हारा तालुक्यातील दानापूर या गावातील सर्वसामान्य अल्पभूधारक कुटुंबातील मुलाने संघर्ष पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मान मिळविला आहे. त्याने नाशिक येथे नुकतेच हे प्रशिक्षण पूर्ण केले.
दानापूर हे गाव विविध क्षेत्रात नावारुपास आलेले. भारतीय सैन्य, आर्मी, बीएएफ, आयकर अधिकरी, पोलिस अशा विविध विभागात उच्च पदावर अनेक युवकांनी भरारी घेत गावाचा नावलौकिक वाढवला आहे. त्यात आज अल्पभूधारक शेतकरी असलेले अर्जुन राऊत यांचा मुलगा मनोज अर्जुन राऊत यांचीही भर पडली आहे. मनोजने नाशिक येथे १५ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. मनोज राऊतसह ६६८ प्रशिक्षणार्थी यांनी देशसेवेचे शपथ घेतली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ऑनलाइन उपस्थित होते.
..............
पहिलीच नियुक्ती नागपूरला
विदर्भाच्या मातीत जन्मलेल्या मनोजची उपनिरीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पहिलीच नियुक्ती त्याला विदर्भात मिळाली. नागपूर येथे त्याला नियुक्ती मिळाल्याचे मनोजने यावेळी अभिमानाने सांगितले.
......................
 
गेले दोन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. माझी परिस्थिती हलाखीची असल्याने मला खूप अडचणींचा सामना करावा लागला. संघर्ष करताना मी कुठेही खचलो नाही. उलट माझे लक्ष्य गाठण्यासाठी प्रत्येक टप्प्यावरील अडचणीवर मात केली. जिद्दीच्या भरवशावर पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली, प्रशिक्षण पूर्ण केले व आज या पदावर रुजू होत आहे. माझ्या या संघर्षात व यशा माझे आई-वडिल सतत माझ्यासोबत राहिले याचा मला अभिमान आहे.
- मनोज राऊत, पोलिस उपनिरीक्षक

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com