esakal | झेंडूच्या फुलांना सोन्याचा भाव, पण यंदा ‘व्यापाऱ्यांचीच’चांदी
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Marigold flower prices rise, big gain for traders

: पावसाने इतर जिल्ह्यातील झेंडू खराब झाल्यामुळे व इतर जिल्ह्यात मालाची मागणी जास्त दरात असल्याने स्थानिक बाजारात झेंडूच्या फुलांचे भाव गगनाला जाऊन भिडले.

झेंडूच्या फुलांना सोन्याचा भाव, पण यंदा ‘व्यापाऱ्यांचीच’चांदी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मंगरुळपीर (जि.अकोला)  : पावसाने इतर जिल्ह्यातील झेंडू खराब झाल्यामुळे व इतर जिल्ह्यात मालाची मागणी जास्त दरात असल्याने स्थानिक बाजारात झेंडूच्या फुलांचे भाव गगनाला जाऊन भिडले.

दरवर्षी ३० ते ५० रुपये किलोप्रमाणे मिळणारा झेंडू यंदा दिवाळीच्या पहिल्याच दिवशी चक्क २०० ते ३०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता.

पहिल्यांदाच झेंडूला एवढा विक्रमी भाव मिळाला. स्थानिक थोडेफार शेतकरी वगळता परजिल्ह्यांतील व्यापाऱ्यांनी दोन दिवसांअगोदरच झेंडूची फुले मोठ्या शहरात विक्रीस नेल्याने व्यापाऱ्यांचा फायदा झाला.


यंदा सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील झेंडू काळवंडला होता. यामुळे रंगदार झेंडू भाव खाऊन गेला. जिल्ह्यातील झेंडूची बिकट परिस्थिती लक्षात घेता चाणाक्ष व्यापाऱ्यांनी अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यांत तालुक्यातील झेंडूची फुले तेथे नेऊन विकली.

दिवाळीच्या आदल्या दिवशीच शहरात व्यापाऱ्यांनी १५० ते २०० रुपये किलोने झेंडू विकला जात होता. दुपारनंतर भाव कमी होतील, या आशेने अनेकजण जेव्हा दुपारी खरेदीला बाहेर पडले तेव्हा त्यांना झेंडूचे दर्शनच झाले नाही. सर्वत्र या भाववाढीचा फायदा काही शेतकऱ्यांनाच झाला.

पण, या ‘व्यापाऱ्यांनी’ चांदी करून घेतली. परजिल्ह्यात झेंडू नेऊन तिथे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी तिप्पट नफा कमावला, हेच यामागील सत्य होय.

(संपादन - विवेक मेतकर)