VIDEO: भाजपाचे वीजबिल होळी करीत जन आक्रोश आंदोलन

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 23 November 2020

राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने वीजबिलात सवलत द्या अन्यथा जनतेद्वारे सरकारला जोराचा चटका देऊन त्यांना कट करू, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार ॲड. आकाशदादा फुंडकर यांनी केले.

खामगाव (जि.बुलडाणा) : राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने वीजबिलात सवलत द्या अन्यथा जनतेद्वारे सरकारला जोराचा चटका देऊन त्यांना कट करू, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार ॲड. आकाशदादा फुंडकर यांनी केले.

सोमवार, ता. २३ नोव्हेंबर रोजी भाजपतर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून जन आक्रोश आंदोलन केले त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा - शाळांची घंटी आजपासून वाजणार; पालकांची लेखी संमती आवश्यक

या आंदोलनात सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश सह संयोजक सगर फुंडकर यांचेसह भाजप नेते रामचंद्र पाटील, नगराध्यक्ष सौ अनिताताई डवरे, जिल्हा सचिव संजय शिनगारे, शरदचंद्र गायकी, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, दिलीप पाटील, संजय शर्मा, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, किसान आघाडी तालुकाध्यक्ष संजय ठोंबरे, शांताराम बोधे, जि प सदस्य डॉ गोपाल गव्हाळे, संतोष टाले, न प आरोग्य सभापती राजेंद्र धानोकार, डॉ एकनाथ पाटील, प स सदस्य तुषार गावंडे, विलास काळे, राजेश तेलंग, भगाववनसिंग सोळंके , विजय महाले, वैभव डवरे,विजय महाले, नागेंद्र रोहनकार, जितेंद्र पुरोहित, विध्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शुभम देशमुख, भाजयुमो तालुकाध्यक्ष रुपेश खेकडे, बळीराम लाहुडकार, संतोष घोराडे, त्रंबक बनकर, गजानन मुळीक, चेतन महाले, गोपाल बाठे, नितीन पोकळे, सुरेंद्र पुरोहित, केशव मेहेसरे, जितेंद्र मेहरा,दीपक सुलतान,संजय मोहिते, विकास हटकर, प्रतीक मुंडे, संतोष येवले, अमोल ठाकरे, संजय भागदेवानी, गोलू आळशी, अनंता शेळके, महादेव वाळके, यांचेसह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी , सामान्य नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा -  ह्रदयद्रावक! चारित्र्यावर संशय; पोटात चार महिन्याचे बाळ असतानाही पूनमने गळफास लावून केली आत्महत्या

भोकरदनच्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली
महावितरणच्या गलथान कारभारामुळे भोकरदन तालुक्यातील जाधव कुटुंबातील एकाच घरातील तिन्ही शेतकरी भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेतात पिकाला पाणी देत असताना विजेचा तार अंगावर पडल्याने त्यांचा मृत्यू होऊन संपूर्ण कुटुंब रस्तावर आले. यावेळी महावितरण चा तीव्र निषेध करीत तिन्ही शेतकरी भावंडांना भाजपच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Mass agitation in Khamgaon over BJPs electricity bill Holi