अरे बापरे! चक्क महापौरांनाच झाली कोरोनाची बाधा

मनोज भिवगडे
Monday, 7 September 2020

महानगपालिका हद्दीत कोरोना विषाणू कोविड-१९ चा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. सामान्य नागरिकांसोबत अधिकारी व डॉक्टरही बाधित होते आहे. त्यातच आता अकोल्याच्या महापौर अर्चनाताई जयंतराव मसने याही कोरोना बाधिक झाल्या आहेत.

अकोला :  महानगपालिका हद्दीत कोरोना विषाणू कोविड-१९ चा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. सामान्य नागरिकांसोबत अधिकारी व डॉक्टरही बाधित होते आहे. त्यातच आता अकोल्याच्या महापौर अर्चनाताई जयंतराव मसने याही कोरोना बाधिक झाल्या आहेत.

कोरोना विषाणूचा विळखा अकोला शहरासह जिल्ह्यात घट्ट होताना दिसत आहे. मधल्या काळात महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणू संसर्गीत रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र आता पुन्हा बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

शनिवारीच १२७ रुग्णांची भर पडल्यानंतर रविवारी पुन्हा ९६ बांधित रुग्ण आढळून आलेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रॅपिट अँटिजेन चाचणी वाढविण्यात आल्या आहेत.

मनपातर्फे मोठी उमरी परिसरात घेण्यात आलेल्या चाचणीत महापौर अर्चना मसने यांच्यासह त्याचे पती जयंत मसने यांचीही चाचणी करण्यात आली होती. त्यात महापौरांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कात आलेल्या नगरसेवक व भापजच्या पदाधिकाऱ्यांंचीही चाचणी करण्यात येणार आहे.

नागरिकांनी काळजी घेण्याचे महापौरांचे आवाहन
अकोला महानगरपालिका हद्दीत कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. नियमांचे पालन करावे. मास्क वापरणे, निर्जंतुकिकरण करणे, विनाकारण घराबाहेर पडणे थांबविण्याचे आवाहन महापौर अर्चना मसने यांनी केले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News Mayor Archana Jayant Masane was hit by a corona