esakal | आमदार डॉ. कुटे यांच्या आंदोलनाने हजारो शेतकऱ्यांना दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: MLA Dr. Kutes agitation brought relief to thousands of farmers

जिगाव प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी दोन दिवसांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने डॉ. संजय कुटे यांच्या मागणीची दखल तातडीने घेऊन नवीन निकषानुसार प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्याचे पत्र देऊन हे आंदोलन संपविले. या निर्णयाचा फायदा जिल्ह्यातील हजारो प्रकल्पबाधित शेतकर्‍यांना होणार आहे.

आमदार डॉ. कुटे यांच्या आंदोलनाने हजारो शेतकऱ्यांना दिलासा

sakal_logo
By
अरूण जैन

बुलडाणा: जिगाव प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी दोन दिवसांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने डॉ. संजय कुटे यांच्या मागणीची दखल तातडीने घेऊन नवीन निकषानुसार प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्याचे पत्र देऊन हे आंदोलन संपविले. या निर्णयाचा फायदा जिल्ह्यातील हजारो प्रकल्पबाधित शेतकर्‍यांना होणार आहे.


जिगाव सिंचन प्रकल्पांमध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना त्वरित नवीन निकषानुसार मोबदला मिळावा, या मागणीसाठी आमदार डॉ. संजय कुटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली होती. वारंवार मागण्या निवेदने देऊनही मागणी मान्य न झाल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला होता. जो वर आपल्याला लेखी आश्वासन मिळत नाही, तोवर हे आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली होती.

याच प्रश्नावर त्यांनी अनेक वेळा संबंधित विभागाचे मंत्री पालकमंत्री संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा केल्या. मात्र तरीही तोडगा न निघाल्याने त्यांना हे पाऊल उचलावे लागले. जिगाव सिंचन प्रकल्पांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखालील शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात एक लाखांवर एकर शेत जमीन गेली आहे.

याशिवाय ३२ गावे बुडीत क्षेत्रात येत असल्याने शासनाने प्रचलित नवीन नियमानुसार शेतकर्‍यांना मोबदला देण्यात यावा या संदर्भात गेल्या शासनाच्या काळात आदेश काढण्यात आले होते. काही गावांना नवीन निकषानुसार मोबदलाही देण्यात आला. मात्र नंतरच्या काळात प्रशासनाने संपादित जमिनीचा शेतकऱ्यांना मोबदला जुन्या निकषानुसार देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार होते. मात्र असे होऊ नये यासाठी श्री कुटे गेल्या सहा महिन्यांपासून संघर्ष करीत आहेत.


जिल्हा प्रशासनाकडून वेळकाढू धोरण अवलंबिले जात होते. राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागूनही अधिकार्‍यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे हा प्रश्न अधिकच बिकट होत चालला होता. नवीन निकषानुसार शेतकर्‍यांना मोबदला देणार किंवा न देणार या संदर्भात ठोस लेखी आश्वासन द्या. या भूमिकेवर ठाम होते. सलग दोन दिवस आंदोलन केल्यानंतरही कोणताही तोडगा न निघाल्याने जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून रात्री उशिरापर्यंत चर्चा केल्या व शेवटी रात्री दहा वाजता श्री कुटे यांची मागणी मान्य करीत नवीन निकषानुसार शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. याचा लाभ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना होणार आहे.

मागणी पूर्ण
माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार असतानाही डॉ. कुटे यांच्यावर उपोषणाची ही वेळ आली. मात्र त्यांनी आजवर अशा आंदोलनांच्या इतिहासाला कलाटणी देत, ज्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते, ती मागणी पूर्ण झाल्यानंतरच आंदोलन थांबविले ही बुलडाण्याच्या इतिहासातील पहिलीच घटना असावी.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top