esakal | मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आमदारांनी आक्रमक भूमिका घ्यावी
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: MLAs should take an aggressive stance for the demands of the Maratha community

आझाद मैदान येथे १४ व १५ डिसेंबर रोजी स्थगिती आदेशाच्या अगोदरचे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले ईअबीसी व एसईबीसी मराठा उमेदवार उपोषण करणार आहेत.

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आमदारांनी आक्रमक भूमिका घ्यावी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : आझाद मैदान येथे १४ व १५ डिसेंबर रोजी स्थगिती आदेशाच्या अगोदरचे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले ईअबीसी व एसईबीसी मराठा उमेदवार उपोषण करणार आहेत.

या उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न, सारथी संस्था गतिमान करणे, अण्णासाहेब पाटील महामंडळ, कोपर्डीतील आरोपीचा खटला, मराठा आंदोलनातील तरुणांवरील उर्वरित केसेस मागे घेणे, यांसह इतर मागण्या सोडविण्यासाठी विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील आमदारांनी सदरचे प्रश्न अधिवेशनात उपस्थित करून सोडवावेत, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा अकोलाचे वतीने करण्यात आली.

हे ही वाचा शेतकरी आत्महत्येची १२ प्रकरणं अपात्र तर १३ पात्र ; ६ फेरचौकशीसाठी प्रलंबित


अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नसेल तर, सर्व आमदारांनी अधिवेशनात आक्रमक भूमिका घ्यावी यासाठी मराठा क्रांती मोर्चा अकोला जिल्यातील समन्वयक व कार्यकर्त्यांनी आमदार रणधीर सावरकर, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार नितीन देशमुख व आमदार विप्लव बाजोरिया यांची भेट घेऊन त्यांना सदर मागण्यांच निवेदन सादर केले.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image