शेतकरी आत्महत्येची १२ प्रकरणं अपात्र तर १३ पात्र ; ६ फेरचौकशीसाठी प्रलंबित

सुगत खाडे
Sunday, 13 December 2020

बॅंक व सावकाराकडून घेतलेले कर्ज, नापिकी, घटलेल्या उत्पादनासह मशालगीचा वाढलेल्या खर्चामुळे जिल्ह्यातील शेतकरी यावर्षी हतबल झाले आहेत. त्यामुळे ते आत्महत्येचा मार्ग अवलंबत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना सुद्धा वाढत असल्याचे दिसून येत आहे. 

अकोला :  नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या १२ प्रकरणांना शासकीय मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आले. त्यासह १३ प्रकरण मदतीसाठी पात्र ठरवत ६ प्रकरणांना फेरचौकशीसाठी पाठवण्यात आले.

हे ही वाचा : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला, १५ जानेवारीरोजी मतदान; १८ जानेवारीला मतमोजणी

बॅंक व सावकाराकडून घेतलेले कर्ज, नापिकी, घटलेल्या उत्पादनासह मशालगीचा वाढलेल्या खर्चामुळे जिल्ह्यातील शेतकरी यावर्षी हतबल झाले आहेत. त्यामुळे ते आत्महत्येचा मार्ग अवलंबत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना सुद्धा वाढत असल्याचे दिसून येत आहे. 

हे ही वाचा : बेताल व्यक्तव्य करणाऱ्या दानवेंची काढली गाढव धिंड शिवसेनेच्या वतीने जिल्हाभरात निषेधार्थ आंदोलन

दरम्यान नापिकीसह कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शासकीय मदतीसाठी पात्र, अपात्र ठरवण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची सभा नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. सभेत शेतकरी आत्महत्येच्या १३ प्रकरणांना शासकीय मदतीसाठी पात्र ठरवत १२ प्रकरणांना शासकीय मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आले. याव्यतिरिक्त सहा प्रकरणांना फेरचौकशीसाठी पाठवण्यात आले. बैठकीला समितीचे इतर सदस्य सुद्धा उपस्थित होते.

संपादन - सुस्मिता वडतिले

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelve cases of farmers committing suicide due to indebtedness have been declared ineligible for government assistance