
जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही (मनसे) उतणार आहे. त्यासाठी शनिवारी (ता. २०) ९० पेक्षा जास्त इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ग्राम पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने मनसेचे इंजिन आता ग्रामीण भागात प्रवेश करणार असल्याने त्याचा फटका काेणत्या राजकीय पक्षाला बसेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अकोला : जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही (मनसे) उतणार आहे. त्यासाठी शनिवारी (ता. २०) ९० पेक्षा जास्त इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ग्राम पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने मनसेचे इंजिन आता ग्रामीण भागात प्रवेश करणार असल्याने त्याचा फटका काेणत्या राजकीय पक्षाला बसेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जिल्ह्यातील डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या २२५ ग्रामपंचायतींसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअंतर्गत संबंधित ग्रामपंचायतींमध्ये १५ जानेवारी रोजी मतदान तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत बुधवार (ता. २३) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून इच्छुक ३० डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करु शकतील. त्यामुळे राजकीय पक्षांच्या मोर्चे बांधणीला वेग आला असून विविध राजकीय पक्षांनी उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे. दरम्यान या निवडणुकीत मनसे सुद्धा उतरणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी दिली आहे. त्यासाठी ९० पेक्षा जास्त इच्छुकांनी मुलाखती दिल्या. अनेक जण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली दस्तावेजांचे संकलन करीत आहेत. जास्तीत-जास्त ठिकाणी उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. (संपादन - विवेक मेतकर) |
|||