
हरित क्षेत्रासाठी प्रस्तावित जागेवर स्थानिकांनी केलेले अतिक्रमण काढण्यास होत असलेला विरोध झुगारून महानगरपालिकेने अतिक्रमण काढले व हरित क्षेत्र विकासाचा मार्ग मोकळा केला.
अकोला : हरित क्षेत्रासाठी प्रस्तावित जागेवर स्थानिकांनी केलेले अतिक्रमण काढण्यास होत असलेला विरोध झुगारून महानगरपालिकेने अतिक्रमण काढले व हरित क्षेत्र विकासाचा मार्ग मोकळा केला.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्प २०१७-१८ मधील प्रभाग क्रं. १७ येथील रमाबाई आंबेडकरनगर व दसेरानगर या भागातील ४७ हजार चौरसमीटर शासकीय जागेवर प्रस्तावित करण्यात आले होते.
हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी
या जागेमधून १५ हजार चौरसमीटर जागेवर अतिक्रमण झाले होते. ते काढण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध असल्याने व न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने अतिक्रमण काढण्यात अडचण येत होती. अखेर ता. २३ व २४ नोव्हेंबर असे दोन दिवस मनपा जलप्रदाय विभाग, पश्चिम झोन कार्यालय आणि अतिक्रमण विभागाव्दारे पोलिस बंदोबस्तात या जागेवरील अतिक्रमण काढण्यात आले.
हेही वाचा - अरे बापरे! प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी
त्यानंतर येथे फेन्सींग करण्याचे काम सुरू करण्यात आले. हरित क्षेत्राचे काम या जागेवर प्रगतीपथावर आहे. या कारवाईत मनपा सहा.आयुक्त मथा उपायुक्त पुनम कळंबे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख, विजय वाकडे, पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर मोगरे, मनपा क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र टापरे, विधी अधिकारी शाम ठाकुर, जलप्रदाय विभागाचे एच.जी.ताठे, शैलेश चोपडे, तुषार टिाकईत, अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे तसेच जलप्रदाय विभागातील सर्व कनिष्ठ अभ्यिंता, अतिक्रमण विभाग, झोन कार्यालय आणि महिला व पुरूष पोलीस कर्मचा-यांची उपस्थिती होती.
(संपादन - विवेक मेतकर)