मनपा कर्मचाऱ्यांचे ‘हम नही सुधरेंगे’, सलग चौथ्या दिवशी आढळे लेटलतिफ

मनोज भिवगडे
Tuesday, 20 October 2020

महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या लेटलतिफपणामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी गत आठवड्यात बुधवारपासून कारवाईला सुरुवात केली. शनिवार, रविवार हे दोन दिवश सुटीचे सोडले तर सोमवारी कारवाईचा सलग चौथा दिवस होता. त्यातही विविध विभाग व झोनमधील ४५ कर्मचारी अनुपस्थित आढळून आले.

अकोला :  महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या लेटलतिफपणामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी गत आठवड्यात बुधवारपासून कारवाईला सुरुवात केली. शनिवार, रविवार हे दोन दिवश सुटीचे सोडले तर सोमवारी कारवाईचा सलग चौथा दिवस होता. त्यातही विविध विभाग व झोनमधील ४५ कर्मचारी अनुपस्थित आढळून आले.

कोरोना विषाणू कोविड-१९ मुळे मार्चपासून लॉकडाउन करण्यात आला होता. सलग पाच महिने त्याची कडक अंमलबजावणी झाली. मात्र आता अनलॉक पाचमध्ये बऱ्यापैकी व्यवहार सुरू झाले आहेत. नागरिक कामांच्या निमित्ताने बाहेर पडत आहे.

अशा परिस्थितीत महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा सहा महिन्यांचा आळस कामाज प्रभावित करणारा ठरत होता. परिणामी प्रशासनाच्या कारभाराकडे नागरिक बोट दाखवून लागल्याने आयुक्त संजय कापडणीस यांनी गत बुधवारी विविध विभागांची झाडाझडती घेतली. आयुक्तांच्या या ‘सर्जिकलस्ट्राईक’मध्ये पहिल्यात दिवशी १४७ कर्मचारी लेटलतिफ आढळून आल्याने त्यांच्या एक दिवसाच्या वेतन कपातीचा आदेश आयुक्तांनी दिला होता.

त्यानंतर गुरुवारी आणि शुक्रवारीसुद्धा लेटलतिफ कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. शनिवार, रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी नवीन आठवडा सुरू झाल्यानंतर तरी कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित होतील, अशी अपेक्षा होती. मात्र सोमवारीही ४५ कर्मचारी अनुपस्थित आढळून आले. हजेरी रजिस्टरच्या तपासणीनंतर कोणतीही पूर्वसूचना न देता अनुपस्थित असलेले व वेळेवर कार्यालयात उपस्थित न झालेल्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश आयुक्त कापडणीस यांनी दिला.

सोमवारी करण्यात आलेली कारवाई
नगर सचिव -२, नगररचना-१, आरोग्य व स्वच्छता- ३, जलप्रदाय-१, विद्युत-२१, पूर्व झोन-२, पश्चिम झोन-१, उत्तर झोन-१३, दक्षिण झोन १.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Municipal employees Hum Nahi Sudharenge, late for the fourth day in a row