चार एकरात 51 क्विंटल सोयाबीन,  विधवा महिला अलिशान बी. ने घेतले  विक्रमी उत्पादन

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 15 October 2020

सन २०१२ पासून ते २०२० पर्यंत नऊ वर्षापासून सोयाबीनच्या विक्रमी उत्पादन घेणाऱ्या महान येथील विधवा ज्येष्ठ महिला अलिशान बी. शेख कालू यांनी यावर्षीही विक्रमी पीक घेतले.

महान (जि. अकोला)  : सन २०१२ पासून ते २०२० पर्यंत नऊ वर्षापासून सोयाबीनच्या विक्रमी उत्पादन घेणाऱ्या महान येथील विधवा ज्येष्ठ महिला अलिशान बी. शेख कालू यांनी यावर्षीही विक्रमी पीक घेतले.

अकोला जिल्ह्यातील महान परिसरात त्यांची शेती आहे. त्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची १० ऑक्टोबर रोजी सोंगणी झाली तर १४ ऑक्टोबर रोजी बियाणे काढणी झाली. त्यांना चार एकरात ५१ क्विंटल म्हणजे एकरी साडेबारा क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न झाले.

त्यांना सन २०१२ पासून सोयाबीनचे विक्रमी उत्पादन होत असल्याने त्यांना सीड्स कंपनी व महाबीज महामंडळाकडून सन्मानित सुद्धा करण्यात आले आहे. त्यांना बार्शीटाकळीचे तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे, चांदुरकर कृषी सहाय्यक अनिल ढोरे, यशवंत कोहर, खेडकर, गावंडे सह अन्य कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.

‘कही खुशी कही गम’
यावर्षी झालेल्या जास्त प्रमाणात पावसामुळे महान परिसरातील सोयाबीन,तूर, कपाशी पिकांचा धिंगाना झाला आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगात कमी प्रमाणात दाणा भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात खूप घट आल्याने महान परिसरातील शेतकऱ्यांनी एकरी तीन क्विंटल पासून ते दहा क्विंटल आत झडती लागत असल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांना खर्चही काढता आला नसल्याने ‘कही खुशी कही गम’चे चित्र पहावयास मिळत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Widow Alishan b. Took record production of soybeans