esakal | महाविद्यालयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Naradhamas jailed for molesting a minor girl

महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या एका १६ वर्षाय मुलीचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने येथील तदर्थ अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश डॉ. रचना तेहरा यांनी आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

महाविद्यालयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

वाशीम  : महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या एका १६ वर्षाय मुलीचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने येथील तदर्थ अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश डॉ. रचना तेहरा यांनी आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.


आकाश भिमराव चंद्रशेखर वय २१ असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयीन सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १२ ऑगस्ट २०१७ रोजी पिडिता तिच्या वसतीगृहामधून महाविद्यालयात जात होती. दरम्यान मागून दुचाकीवर आलेल्या आकाश चंद्रशेखर याने पिडीतेस माझ्या गाडीवर बस, तुला कॉलेजला सोडतो असे म्हटले.

परंतु पिडितेने गाडीवर बसण्यास नकार दिला, तेंव्हा आरोपीने त्याची गाडी बाजुला लावून पिडितेस रस्त्याच्या कडेला नेवून तिचा विनयभंग केला तसेच या घटनेबाबत कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

अशातच त्याठिकाणी निर्भया पथक दाखल झाले. हा सर्व प्रकार निर्भया पथकाच्या लक्षात आल्याने पथकाने दोघांनाही पोलिस ठाण्यात आणून पिडितेच्या वडीलांना कळविले.

यासंदर्भात पिडितेने १४ ऑगस्ट २०१७ रोजी वाशीम शहर पोलिसात तक्रार दिल्यावरून पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ३५४ अ, ५०६ भादवी, पोक्सो बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. या प्रकरणाचा तपास पीएसआय नम्रता राठोड यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले.

यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्ष सुनावणीनंतर आरोप सिध्द झाल्याने आरोपीस सेक्शन ८ पोक्सोमध्ये तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने अतिरीक्त सजा तसेच कलम ५०६ मध्ये तीन महिने साधी कैद व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सोबतच न्यायालयाने पिडितेस ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याचे आदेश जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला दिले. या प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू सहायक सरकारी वकील अभिजीत व्यवहारे यांनी मांडली.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top