
तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्रा अंतर्गत निर्गुणा धरणाच्या काठाला वनउपवजत नाका येथील वन विभागातर्फे लाखो रुपये खर्च करून २०१२ मध्ये निसर्ग पर्यटन उभारण्यात आले. येथे मोठ्या प्रमाणात बांध काम केले व पर्यटनासाठी मोठमोठ्या छत्र्या लावण्यात आल्यात.
पातूर (जि.अकोला) : तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्रा अंतर्गत निर्गुणा धरणाच्या काठाला वनउपवजत नाका येथील वन विभागातर्फे लाखो रुपये खर्च करून २०१२ मध्ये निसर्ग पर्यटन उभारण्यात आले. येथे मोठ्या प्रमाणात बांध काम केले व पर्यटनासाठी मोठमोठ्या छत्र्या लावण्यात आल्यात.
चेअर लावण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात ओटे बांधण्यात आले. सोलर लाईटसुधा लावण्यात आले आणि पर्यटनासाठी पॉईंट म्हणून मोठ्या प्रमाणात उंच मनोरेसुधा उभारण्यात आले. मात्र हेच निर्गुणा धरणाच्या काठावर बनविलेले पांढुर्णा निसर्ग पर्यटन वन विभागाच्या मनमानी व भोंगळ कारभारामुळे धूळ खात पडले आहे.
सर्व बांध काम खचले आहे व उंच मनोर्याचे पत्रे सुद्धा उडून गेले आहे. त्यामुळे वन विभागाने लक्ष देऊन पुन्हा सर्व कामाची दुरुस्ती करावी अशी मागणी येणाऱ्या पर्यटकांची आणि परिसरातील सर्व गावातील लोक करीत आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)