५३२ सरपंच पदाचे आरक्षण रद्द, आता सोडत निवडणुकीनंतर

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 19 December 2020

 सन् २०२०-२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचतीच्या सरपंच पदाचे आरक्षण ११ डिसेंबर रोजी काढण्यात आले होते. मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी निवडणुकीपूर्वी काढण्यात आलेले सरपंच पदाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय १५ डिसेंबर रोजी घेतल्याने आता निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
 

अकोला :  सन् २०२०-२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचतीच्या सरपंच पदाचे आरक्षण ११ डिसेंबर रोजी काढण्यात आले होते. मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी निवडणुकीपूर्वी काढण्यात आलेले सरपंच पदाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय १५ डिसेंबर रोजी घेतल्याने आता निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

राज्यात १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून आठ जिल्ह्यात आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यामध्ये अकोला जिल्ह्याचा सुद्धा समावेश होता. मात्र राज्य शासनाने याबाबत पत्र काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक पार पडल्यानंतर नव्याने आरक्षण काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान आता पर्यंत हाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच सरपंचपदाची सोडत जाहीर होत होती. पण सरपंचपदासाठी होणारा घोडेबाजार आणि खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर निवडणूक लढवण्याचे प्रकार वाढल्यामुळेच नवा निर्णय घेण्यात आला.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती
तालुका ग्रा.पं. संख्या
तेल्हारा ३४
अकोट ३८
मूर्तिजापूर २९
अकोला ३६
बाळापूर ३८
बार्शीटाकळी २७
पातूर २३
----------------------
एकूण २२५

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Reservation of 532 Sarpanch posts canceled, now leaving after elections