नवविवाहितेला आधी मारले आणि नंतर लटकविले फासावर, पतीसह सासू-सासऱ्यांनी केला विवाहितेचा खून, आत्महत्या भासवून मृतदेह ठेवला लटकवून

Akola News newlyweds killed first and then hanged, Husband and mother-in-law commit marital murder, pretend to commit suicide and hang dead body
Akola News newlyweds killed first and then hanged, Husband and mother-in-law commit marital murder, pretend to commit suicide and hang dead body

अकोला  ः लग्नात हुंडा कमी झाला म्हणून सतत माहेरहून पैसे घेऊन ये या कारणावरून पती मारहाण करायचा. त्यात सासू-सासरेही तेल ओतायचे. अशाच कारणावरून रविवारी रात्री नवविवाहितेला तिच्या पतीने सासू-सासर्‍यांनी मारहाण केली.

त्यात तिचा मृत्यू झाला नंतर तिचा मृतदेह हा फासावर लटकला व तिने आत्महत्या केल्याचे भासवले. मात्र, विवाहितेच्या आई-वडिलांनी घेतलेल्या संशयावरून आणि पोलिसांनी केलेल्या सखोल तपासानंतर आत्महत्या नसून ही हत्या असल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी पती, सासू-सासरे यांना अटक केली त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. ही घटना जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलवाडे प्लॉट येथे घडली.


सुमय्या परवीन शेख इमरान (वय २०) असे मृतक नवविवाहितेच्या नाव आहे. १ जानेवारी २०२० रोजी सुमया परवीन हीचा निकाह शेख इम्रान याच्यासोबत झाला होता. माहेरहून पैसे आणण्यासाठी पती, सासरा शेख जब्बार तिला तगादा लावत होते.

त्यावरून त्यांच्यामध्ये रोज भांडण होत होते. शेख इमरान व सासरा शेख जब्बार हे मिस्त्रीचे काम करीत होते. पैसे आणण्यावरून पती, सासरा आणि सासू यांनी तिचा रविवारी रात्री छळ केला. आपल्या आई-वडिलांची परिस्थिती चांगले नाही म्हणून पैसे कुठून आणणार असे सूमया परविन हिने म्हटले.

त्यानंतर या तिघांना ही राग अनावर झाला. त्यांनी तिचा कपड्याच्या सहाय्याने गळा आवळला. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिने गळफास घेतल्याचा बनाव या तिघांनी केला. या तिघांनी तिला तत्काळ सकाळी रुग्णालयात दाखल केले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी जुने शहर पोलिस उपनिरीक्षक सुजित कांबळे यांनी यामध्ये सकाळी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. त्यानंतर पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने यांना शंका आल्याने डीबी पथकास तपास करण्याचे सूचना दिल्या.

त्यानुसार डीबी पथकाचे सदाशिव सुळकर, अनिस पठाण, महेंद्र बहादूरकर, अनिल खेडेकर, नितीन मगर, धनराज बायस्कर यांनी पती शेख इमरान, सासरा शेख जब्बार, सासू रजियाबी यांची कसून चौकशी केली.

त्यानंतर वैद्यकीय अहवालामध्ये गळफास दिल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी खुनाची कबुली दिली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरुद्ध कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आज या प्रकरणामधील आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे.
(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com