esakal | माहिती अधिकाराता माहिती न दिल्याने अधिकाऱ्याला एक लाखाच्यावर दंड
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Officer fined Rs one lakh for not providing information to RTI

नगरपरिषदमधील चार अधिकाऱ्यांनी माहिती अधिकारा अंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी राज्य माहिती आयुक्त अमरावती यांनी त्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकरणात १ लाख ५६ हजार ७५० रूपयांचा दंड ठोठावला आहे.

माहिती अधिकाराता माहिती न दिल्याने अधिकाऱ्याला एक लाखाच्यावर दंड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

मलकापूर (जि.अकोला) :  नगरपरिषदमधील चार अधिकाऱ्यांनी माहिती अधिकारा अंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी राज्य माहिती आयुक्त अमरावती यांनी त्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकरणात १ लाख ५६ हजार ७५० रूपयांचा दंड ठोठावला आहे.


याबाबतची माहिती अशी की, माहिती अधिकार कार्यकर्ते जनार्दन बंशी बोदरे, नंदकिशोर वर्मा यांनी मलकापूर नगरपरिषद अंतर्गत शहरामध्ये सुरू असलेल्या विविध विकासात्मक कामे न.प.ने शहरातील जिनिंग फॅक्ट्यांकडून १० वर्षात वसुल केलेल्या मालमत्ता कराची माहिती,

अल्पसंख्यांक निधीमधून केलेली कामे, नगर पालिका हद्दीत ईमारतींना देण्यात आलेल्या परवानग्यांची माहिती, नगरपालिका उपाध्यक्ष हाजी रशिदखाँ जमादार यांनी त्यांच्या वार्डात केलेल्या विकासाच्या कामांची माहिती, अतिक्रमण हटविण्या बाबत करण्यात आलेल्या खर्चाची माहिती, दलित सुधार वस्ती अंतर्गत पंतनगरमध्ये करण्यात आलेल्या विकासाच्या कामांची माहिती आदींबाबत माहिती मागितली होती.

त्यामध्ये तत्कालीन नगरअभियंता नंदकिशोर येवतकर यांना ३ प्रकरणात प्रत्येकी २५ हजार तर एका प्रकरणात १७ हजार ७५० रू. तसेच तत्कालीन लेखापाल सोमनाथ बोराडे यांना १४ हजार रू., तत्कालीन पाणी पुरवठा अधिकारी अमिल कोलते यांना २५ हजार रू., तत्कालीन कर निरीक्षक आर.बी.ठाकरे यांना २५ हजार रूपये असे एकूण चार अधिकाऱ्यांना १ एक लाख ५६ हजार ७५० रूपयांचा दंड राज्य माहिती आरोग्य अमरावती खंडपीठ अमरावतीचे संभाजीराव सरकुंडे यांनी एकूण ७ आदेशांद्वारे ठोठावला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)