esakal | काटेपूर्णा नदी पात्रात ट्रक पडून एकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: One dies after truck falls into Katepurna river basin

राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काटेपूर्णा नदीच्या पात्रात ट्रक शंभर फूट खोल पडून एकाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ५ वाजता दरम्यान घडली.

काटेपूर्णा नदी पात्रात ट्रक पडून एकाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

कुरणखेड (जि.अकोला)  ः राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काटेपूर्णा नदीच्या पात्रात ट्रक शंभर फूट खोल पडून एकाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ५ वाजता दरम्यान घडली.


प्राप्त माहितीनुसार मूर्तिजापूरकडून अकोल्याकडे जाणारा ट्रक क्रमांक एम.एच.४८ ए .जी.१४६५ ट्रक कोळसा वाहून नेत असताना काटेपूर्णा नदीवरील पुलावरून खड्डे चुकवत असताना धुक्यामुळे पुलाचा अंदाज न आल्याने वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. हा ट्रक काटेपूर्णा नदीच्या पात्रात शंभर फूट खोल पडला.

त्यात ट्रकचा चुराडा झाला. चालक साहेब खा युसुफ खा (रा. पालघर मुंबई) याचा घटना स्थळावर ट्रकमध्ये अडकून मृत्यू झाला. क्लिनर औरंगजेब खा हलील खा हा जखमी झाला. तोही ट्रकमध्ये अडकला होता. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सुनील सोळंके, हेड कॉन्स्टेबल दीपक कानडे, योगेश काटकर, धनसिंग राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन अडकलेल्या क्लिनरला काटेपूर्णा येथील आपातकालीन पथकाच्या मदतीने बाहेर काढले. त्याला अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image