esakal | ह्रदयद्रावक घटना: एका वाहनाने उडवले तर दुसर्‍याने चिरडले !
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: One vehicle blew up and another crushed!

एका वाहनाने धडक देऊन उडविलेल्या अकोला जिल्ह्यातील पातूर येथील एकाच कुटुंबातील तीन मोटरसायकल स्वारांना दुसऱ्या एका वाहनाने चिरडले. डोणगाव नजीक झालेल्या या विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला व वाहनाचा ही चुराडा झाला आहे. मरण पावलेल्यांमध्ये आजी-आजोबा व नातवाचा समावेश आहे

ह्रदयद्रावक घटना: एका वाहनाने उडवले तर दुसर्‍याने चिरडले !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

डोणगांव (जि. बुलडाणा) : एका वाहनाने धडक देऊन उडविलेल्या अकोला जिल्ह्यातील पातूर येथील एकाच कुटुंबातील तीन मोटरसायकल स्वारांना दुसऱ्या एका वाहनाने चिरडले. डोणगाव नजीक झालेल्या या विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला व वाहनाचा ही चुराडा झाला आहे. मरण पावलेल्यांमध्ये आजी-आजोबा व नातवाचा समावेश आहे


प्राप्त माहितीनुसार डोणगाव जवळ मेहकरकडे जाताना नागपूरकडे जाणाऱ्या वळणावर रविवारी (ता.१) दुपारी ३ वाजता दरम्यान पातूर वरून साकरखेर्डा येथे मुलीच्या भेटीसाठी जाणाऱ्या एमएटी मोटारसायकल वरून वृद्ध दांपत्य नातवासह चालले होते. त्याचवेळी एका टँकरने त्यांना उडविले तर समोरून येणाऱ्या आयशर या वाहनाने चिरडले. या घटनेत तिघांचा जागेवरच मृत्यू झाला.

औरंगाबाद-नागपूर राज्य महामार्गावर डोणगावपासून जवळच असलेल्या वळणावर अकोला जिल्हातील पातूरवरून अब्दुल जब्बार अब्दुल रज्जाक (६५) व त्यांची पत्नी जमीला बी अब्दुल रज्जाक (५८) आणि नातू म. हाशिम (१२, सर्व राहणार सळणीपुरा पातूर) एमएटी वाहनाने बुलडाणा जिल्हातील साखरखेर्डा येथे मुलीच्या भेटीसाठी चालले होते. दरम्यान, डोणगावपासून जवळच मेहकरकडे जाताना वळणावर मेहकरकडून येणाऱ्या टँकरने धडक दिली.

तर मागून मालेगावकडून येणाऱ्या आयशरने तिघांना चिरडले. यात आजी आजोबासह नातू जागेवरच मृत झाले. अपघात इतका गंभीर होता की तिन्ही मृतकाचे मृतदेह छिन्न विच्छिन्न झाले होते. तर मोटारसायकलसुद्धा चुराडा झाली आणि दोन्ही वाहन रकस्त्याच्या खाली गेले. यात टँकर चालकाला बघणाऱ्यांनी मारहाण केली दिला. दोन्ही वाहनाचे चालक व वाहक सुखरूप आहेत.

डोणगाव पोलिसांनी अपघात स्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रित केली व मृतकासोबत असलेल्या साहित्याची पाहणी केली असता त्यात शहादा बानू अब्दुल रज्जाक राहणार पातूर हा शाळा सोडण्याचा दाखला मिळाला. त्यावरून मृतकाची ओळख पटली. पातूर येथे माहिती मिळताच शोककळा पसरली. हा परिवार खूप गरीब असून, मृतक अब्दुल जब्बार या वयातसुद्धा मोल मजुरी करून आपल्या परिवारास हातभार लावत होते. या दाम्पत्याची मुलीच्या घरी जाण्याची इच्छा अपुरीच राहिली.

(संपादन - विवेक मेतकर)