अन्यथा राज्यभर दूध बंद करावे लागेल, रविकांत तुपकर

विवेक मेतकर
Saturday, 18 July 2020

दुधाचे दर पडल्यामुळे राज्यातील शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आला आहे. दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांचे तातडीने अनुदान द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 21 जुलै रोजी एक दिवसाचे राज्यव्यापी लाक्षणिक दूध बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे.

अकोला : दुधाचे दर पडल्यामुळे राज्यातील शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आला आहे. दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांचे तातडीने अनुदान द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 21 जुलै रोजी एक दिवसाचे राज्यव्यापी लाक्षणिक दूध बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे.

केंद्र व राज्य सरकारने दूध दरामध्ये तातडीने हस्तक्षेप करावा अन्यथा आम्हाला राज्यभर दुध बंद करावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. तसेच 21 जुलैच्या दुध बंद आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी व्हा असे आवाहनही तुपकरांनी केले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी ्क्लिक करा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाने राज्यातील दूध व्यवसायावर संक्रात आलेली आहे. लॉकडाउनमुळे हॉटेल, आईस्क्रिम, मॉल, विवाह सोहळे आदी बंद झाले आहेत. याचा विपरीत परिणाम दुधाच्या खपावर झालेला आहे. राज्यात दररोजचे दूध उत्पादन 119 लाख लिटर आहे. 52 लाख लिटर हे अतिरिक्त झाले आहे. तसेच दूध पावडरचा दर 330 रुपयांवरून 180 रुपयांवर आलेला आहे. कोरोनामळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चीन, युरोप व आफ्रिका या देशातील निर्यात बंद झाले आहे.

अकोल्यात रेल्वे कोच फॅक्‍टरीसाठी 100 कोटीचा प्रस्ताव

देशात सध्या 1.5 लाख टन दूध पावडर शिल्लक असून राज्यात देखील 50 हजार टन दूध पावडर शिल्लक आहे. तरीही केंद्र सरकार 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेऊन दूध उत्पादकांना देशोधडीस लावण्याचे पाप करत आहेत. तसेच बटरचा दर 340 रूपयावरून 220 रुपये झाल्याने याचा परिणाम दूध खरेदीवर झाला असून, अनेक संस्था 17 ते 20 रुपये लिटरने दुधाची खरेदी करत आहेत.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे.या विविध मागण्यांकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांनी 21 जुलै रोजी एक दिवसाचे दूध बंद आंदोलन पुकारले आहे. या दूध बंद आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news Otherwise milk will have to be stopped across the state, Ravikant Tupkar