esakal | कोविड हाॅस्पिटलमध्ये रुग्णांना थर्माकॉल ताटात जेवण
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Patients at Kovid Hospital have a meal in a thermocol tray

बुलडाणा जिल्ह्यातील कोविड हाॅस्पिटलमध्ये दाखल रुग्णांना शासनाने बंदी घातलेल्या थर्माकॉल ताटांमध्ये जेवण वितरीत केल्या जात आहे. हा प्रकार नांदुरा येथील पत्रकार जगदीश आगरकर यांनी निदर्शनास आणून दिला आहे. गेले अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे.

कोविड हाॅस्पिटलमध्ये रुग्णांना थर्माकॉल ताटात जेवण

sakal_logo
By
विरेंद्रसिंह राजपूत

नांदुरा (जि.बुलडाणा) : बुलडाणा जिल्ह्यातील कोविड हाॅस्पिटलमध्ये दाखल रुग्णांना शासनाने बंदी घातलेल्या थर्माकॉल ताटांमध्ये जेवण वितरीत केल्या जात आहे. हा प्रकार नांदुरा येथील पत्रकार जगदीश आगरकर यांनी निदर्शनास आणून दिला आहे. गेले अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे.


राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यात प्लाॅस्टिक बंदी, थर्माकोल वापर बंदीचे स्पष्टपणे निर्देश दिले आहेत. असे असतानाही कोविड रुग्णालयात कोणत्या अधिकाऱ्यांचे पुर्वपरवानगीने थर्माकॉल ताटांचा वापर सुरू आहे,

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

याची चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते तथा पत्रकार जगदिश आगरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. बंदी असलेल्या थर्माकॉल ताटांचा गैरप्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांची तक्रार मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, शिवसेना आमदार संजय गायकवाड, काॅंग्रेस आमदार राजेश एकडे यांच्याकडे करण्यात आली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)