पिकनिकमध्ये पाण्याशी खेळ पुन्हा बेतला जीवावर

अरूण जैन 
Wednesday, 16 September 2020

नदीत पोहायला गेलेले तीन युवक वाहून गेल्याची सिंदखेडराजा तालुक्यातील चांगेफळ येथील घटना ताजी असतानाच पाण्याशी केलेला खेळ पिकनिकला गेलेल्या शाळेतील एका कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतला आहे.

बुलडाणा  :  नदीत पोहायला गेलेले तीन युवक वाहून गेल्याची सिंदखेडराजा तालुक्यातील चांगेफळ येथील घटना ताजी असतानाच पाण्याशी केलेला खेळ पिकनिकला गेलेल्या शाळेतील एका कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतला आहे.

 यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील जिजामाता महाविद्यालयाचे 3 शिक्षक व 1 कर्मचारी पुरुषोत्तम मानक,र अशोक गवळी, कुवरसिंग राजपूत व दिलीप वैराळ हे चौघेजण बुलडाणा तालुक्यातील बोरखेड येथे कुंवर सिंग राजपूत यांच्या गावी आले होते. 

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

आपल्या मित्रांच्या भेटीगाठी घेऊन ते ज्ञानगंगा अभयारण्यात पलढग प्रकल्प पाहण्यासाठी गेले. तेथे थांबल्यानंतर पर्यटनाचा आनंद घेत असताना त्यांना नदीत आंघोळ करण्याचा मोह आवरला नाही.

पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दिलीप वैराळ हे प्रवाहात वाहून गेले. बराच वेळ रडल्यानंतर ही त्यांचा थांगपत्ता लागला नाही त्यामुळे यातील इतर तिघांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.  इतर तीन शिक्षक मात्र सुखरूप आहेत. दिलीप वैराळ हे शिपाई म्हणून कार्यरत होते.

हेही वाचा- बापरे! तीन युवकांचा नदीमध्ये बुडून मृत्यू,  दोन मृतदेह अजुनही बेपत्ता

 घटनेची माहिती मिळताच बुलडाणा पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र दिलीप वैराळ यांचा शोध लागू शकला नाही. ते बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या पोलिस, बचाव पथक व ग्रामस्थ त्यांचा शोध घेत आहेत.

कोणाच्या काळात पर्यटनाचा आनंद घेताना योग्य ती खबरदारी न घेतल्याने अशा घटना घडत आहेत त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग आणि जागरूक राहून वागण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

 

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Playing with water at a picnic again